दिनकर पाटील मनसेत प्रवेश करणार, पश्चिममधून लढणार

नाशिक: प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी ने नाशिक पश्चिममधून उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडाचा झेंडा फडकवणारे महापालिका माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मनसेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.   नाशिक पश्चिममधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे नाशिक पश्चिममधून दिनकर पाटील हे मनसे चे उमेदवार होऊ शकतात. दिनकर पाटील हे आज मनसे मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी ते कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *