नाशिकची जागा भाजपाने लढवावी
दिनकर पाटील यांची पक्षानेतृत्वाकडे मागणी
भाजपाकडून पुन्हा नाशिकच्या जागेवर दावा
नाशिक : प्रतिनिधी
राजकीय परिस्थिती भाजपासाठी अनुकुल असून चारशे पार जाण्यासाठी भाजपानेच नाशिकची जागा लढवायला हवी अशी मागणी भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य दिनकर पाटील यांनी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे केली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरठामंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले असले तरी अद्याप नाशिकच्या जागेचा तिढा सुटू शकला नाही तर या जागेवर महायुतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गट आग्रही आहेत. त्यामुळे नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा सुटायचे चिन्ह दिसत नाही. त्यातच आता भाजपाने पुन्हा नाशिकच्या जागेवर दावा केला आहे.
दिनकर पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना अजूनही महायुतीच्या उमेदवाराबाबत संभ्रमावस्था कायम आहे. युतीकडील घटक पक्षांचे दावे पतिदावे यात हा मतदारसंघ अडकल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी कमी असलेल्या वेळेचा आणि एकूणच राजकीय , सामाजिक परिस्थितीचा विचार करीत माघार घेणे पसंत केलेआहे. भुजबळांच्या माघारीमुळे नाराज असलेल्या ओबीसी बांधवाना संघटित करणे हेही कमी काळातील मोठे आव्हान असणार आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती ही इतर कोणत्याही पक्षापेक्षा भाजपाला जास्त अनुकूल आहे. मागील दहा वर्षापासून भाजपाचे असलेले तीन आमदार, महानगरपालिेकतील सत्ता ,त्र्यंबकेश्वर नगरपालिेकतील सत्ता, पक्षाचे मतदारसंघाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत असलेले संघटन, भाजपाला मानणारा मोठ्या प्रमाणात असलेला वर्ग आणि सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वमान्य नेतृत्व , या सर्व गोष्टीचा विचार करून भाजप कोअर कमिटीचे सदस्य, सर्व मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आमदार, नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांनी पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला महायुतीत नाशिकची जागा भाजपाला सोडण्याची मागणी केली आहे. कोणत्याही अवास्तव गोष्टींचा विचार न करता अत्यंत अभ्यासपूर्वक आणि पक्षाकडून झालेल्या अनेक सर्वेक्षणांच्या आधारे नाशिक लोकसभेत भाजपाला यश मिळेल अस दावा केला जात आहे. त्यामुळे भाजपानेच नाशिकची जागा लढवावी अशी आग्रही मागणी पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…