नांदगाव तालुक्यात गलिच्छ राजकारण
खोटे गुन्हे दाखल करून तरुणांचे आयुष्य बरबाद करण्याचा प्रकार
मनमाड : प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील राजकीय परिस्थिती अतिशय गलिच्छ झाली असुन तु यांच्यासोबत का फिरतो तु त्याच्यासोबत का फिरतो तसेच आमच्या विरोधात बोलतो यासह इतर कारण पुढे करुन राजकीय द्वेष आणि आकस मनात ठेवून राजकीय बळाचा वापर करून कार्यकर्ते व तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा धडाका या नांदगाव तालुक्यात घडत असुन असंविधानिक कृत्य करून गलिच्छ पद्धतीने राजकारण करण्याचा प्रकार सर्रासपणे बघायला मिळत असुन या घटनांचे सोशल मीडियावर मोठया प्रमाणात वाभाडे काढण्यात येत आहे.शहरातील तरुणाई वाया जाऊ नये म्हणून शासकीय जागेवर असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांवर सूडबुद्धीच्या भावनेने 354 सारखे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले याचा शहरातील सुज्ञ नागरिकांकडून निषेध करण्यात येत आहे सत्तेचा गैरवापर होत असल्याचा देखील आरोप तालुक्यातील जनता उघडपणे बोलून दाखवत आहे.यात पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असुन एकीकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून नागरिकांना उपोषण आंदोलन करावे लागत आहेत तर दुसरीकडे एक फोनवर कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता थेट खोटे गुन्हे दाखल करुन घेण्यात येत आहे. या खोट्या गुन्ह्यांची सखोल चौकशी करावी. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी व फिर्याद खोटी असेल तर फिर्यादीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीमसैनिकाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांच्याकडे केली आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन सात दिवसात सगळे पुरावे आणि सत्य परिस्थितीचा लेखी अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.
मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील राजकीय परिस्थिती आता अतिशय वेगळी झाली . केवळ सूडबुद्धीने व राजकीय आयुष्य बरबाद करण्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा विचार न करता खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे. संतोष गुप्ता यांच्या दुकानात चोरी करायला आलेल्या काही लोकांनी गांजा ठेवला व याची माहिती तहसीलदार यांच्यासह पोलीस यंत्रणेला मिळाली. त्यांच्यावर गांजा बाळगतो म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला दुसरीकडे भावी आमदार म्हणून कार्यक्रम करत असलेल्या वंचीत बहुजन आघाडीचे तालुकाप्रमुख बाळासाहेब बोरकर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे. त्यांची तक्रार देखील घेतली जात नसल्याने तेदेखील आमरण उपोषण करत आहे याशिवाय मनमाड शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या बाजूला नगर पालिकेच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर मटका रनिग टेबल दारू यासह अवैध धंदे सुरू आहेत या धंद्याना बंद करण्यात यावे अशी मागणी शहरातील काही तरूणांनी नगर पालिका व पोलिस प्रशासन यासह गृहमंत्री यांच्याकडे केली याचा राग मनात ठेवून घरातील महिलांचा वापर करून 354 सारखे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेचा सर्व शहरातील जनतेने निषेध केला याप्रकारे तरुणांचे आयुष्य बरबाद करणे योग्य नाही याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर मेसेज व्हायरल होत आहे. केवळ एक फोन आला का पोलीस निरीक्षक कोणत्याही प्रकारचा विचार न करता थेट गुन्हा दाखल करुन घेत आहे मात्र शहरातील भीमसैनिकांनी उपविभागीय पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार चुकीचा असल्याचे सांगितले . त्यांनीही याची गंभीर दखल घेऊन योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.या सर्व प्रकारच्या विरोधात तालुक्यातील या घटनांची सीबीआय व एस आयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेना उपिजल्हा प्रमुख संतोष बळीद यांनी केली आहे.