नाशिक

रेल्वेमार्गावरून मतभेद; सिन्नरकरांच्या स्वप्नात संभ्रम

प्रहार जनशक्ती पक्षाच्या धरणे आंदोलनाने तालुक्यात चर्चेला उधाण

सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक-पुणे रेल्वे म्हणजे सिन्नरकरांसाठी केवळ प्रवासाची सोय नाही, तर रोजगार, उद्योग आणि भविष्याशी जोडलेली आशा आहे. मात्र, या स्वप्नाला दिशा कोणती, यावरच आता मतभेद उफाळले आहेत. एकीकडे नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी, यासाठी तालुक्यात जोरदार जनआंदोलन सुरू असतानाच, दुसरीकडे प्रहार जनशक्ती पक्षाने वेगळ्या मार्गाची मागणी केल्याने सिन्नरकरांचा गोंधळ वाढला आहे.

गुरुवारी (दि. 22) प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सिन्नरच्या इंडियाबुल्समार्गे शिर्डी-पुणे रेल्वे सुरू करावी, अशी मागणी केली. पक्षाने दिलेल्या निवेदनात तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आलेला नाशिक-नारायणगाव रेल्वेमार्ग एकलहरे-गुळवंच इंडियाबुल्स मार्गे पुन्हा सुरू करावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
यासोबतच सिन्नर शहरात स्वतंत्र रेल्वेस्थानक उभारावे, तसेच रखडलेला इंडियाबुल्स प्रकल्प तातडीने सुरू करून बेरोजगारी कमी करावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात तालुकाध्यक्ष कैलास दातीर, संगीता आगळे, चंद्रकांत डावरे, पांडुरंग आगळे, भास्कर दराडे, खंडू सांगळे, आनंदा सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, रेल्वेमार्ग आणि उद्योग सुरू झाल्यास सिन्नरमधील तरुणांचे स्थलांतर थांबेल आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होईल. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास नाशिक लोकसभा मतदारसंघात जनजागृती आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे. तसेच आगामी कुंभमेळ्यापूर्वी किमान दोन लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणीही करण्यात आली आहे.

Disagreement over railway line; Confusion in Sinnarkar’s dream

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago