गोपीचंद पडळकर भुजबळ फार्मवर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा
नाशिक: प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भुजबळ फार्म हे राजकारणाचे मुख्य केंद्र बनले आहे, सातत्याने राजकिय नेतेमंडळी भुजबळ फार्मवर येत आहेत, आज सकाळी
भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.