लासलगाव : वार्ताहर
सर्वसामान्यांची दिवाळी सुखकर व्हावी म्हणून लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठानतर्फे सवलतीच्या दरात ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर दिवाळी फराळ विक्रीचा शुभारंभ विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाचे शिक्षक राहुल दरेकर, गणेश दरेकर, दीपक सरोदे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करण्यात आली.
कार्यक्रमासाठी फराळ पुरवठादार मोईन खान, नरेंद्र परदेशी, नरेंद्र भास्कर परदेशी, अविनाश नवले, तेजल रायते, प्रकाश वाघाटे यांचा सत्कार करण्यात आला. सरस्वती माता व कै. दत्ताजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन भाऊसाहेब बोचरे व निवृत्ती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, शंतनू पाटील, अभय पाटील, नीता पाटील, पुष्पा दरेकर, कोंडाजी जाधव, दत्ता रायते, शेखर होळकर, विजय पाटील, योगेश पाटील, निवृत्ती गायकर, प्रकाश गांगुर्डे, डॉ. सुरेश दरेकर, डॉ. कैलास पाटील, डॉ. युवराज पाटील, डॉ. अशोक महाले, देवीदास पाटील, तुळशीराम जाधव, लक्ष्मण मापारी, कैलास ठोंबरे, सीताराम जगताप, विठ्ठलराव गायकर, भागवतराव होळकर, शाहू होळकर, अरुण शर्मा, राजाभाऊ कराड, जनार्दन जगताप, राजाराम दरेकर, राजाराम मेमाणे, केशव होळकर, विजय रायते, किशोर दरेकर, योगेश दरेकर, सुभाष रोटे, राजाराम सानप, प्रकाश कापडी, दत्तूलाल शर्मा, दिलीप पानगव्हाणे, लासलगाव प्रेस क्लबचे सर्व सदस्य, प्राचार्य विजय वाणी, मुख्याध्यापिका शारदा केदार, मुख्याध्यापक मोहन निकम, दीपक धात्रक आदी मान्यवर उपस्थित
होते.
गत अठरा वर्षांपासून या प्रतिष्ठानतर्फे दिवाळी फराळाची सुरुची मिठाई या नावाने दिवाळी फराळरूपी पदार्थ सोनपापडी, मोतीचूर लाडू, करंजी, नानकटाई, गुलाबजाम, अनारसे, शंकरपाळे आदी तसेच दोन-तीन प्रकारच्या शेव व चिवडा, चकली आदी तिखट पदार्थ केवळ 120 रुपये प्रतिकिलो प्रतिपाकीट या दराने विक्री केली जाते. यावर्षी सुमारे 90 हजार किलो फराळ पदार्थांची उपलब्धता करण्यात आली. आगामी पाच ते सहा दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत लोकनेते दत्ताजी पाटील स्मारकाशेजारी या दिवाळी फराळ पदार्थाची विक्री सुरू राहणार आहे, अशी माहिती संयोजक नानासाहेब पाटील व संजय पाटील यांनी दिली.
लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठान व त्यांच्याशी संलग्न लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लासलगाव शिक्षण सहायक मंडळ, लासलगाव खरेदी-विक्री संघ या संस्थेच्या संचालकांचा व कर्मचारीवर्गाचा सक्रिय सहभागातून ही सेवा पार पडते.