नवीन घंटागाड्यांची उंची ठरतेय डोकेदुखी
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी आणलेल्या नवीन घंटागाडयांबाबत महिलांच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. आकाराने लहान असलेल्या या घंटागाड्यांची उंची जास्त असल्याने कचरा टाकण्यासाठी महिलांचा हातच पुरत नसल्याने कचरा टाकण्यासाठी उभे राहण्यास आता स्टूल किंवा खुर्ची घेऊन जायची का? असा सवाल महिलांकडून केला जात आहे.
शहरामध्ये घंटागाडी ठेकेदाराने नवीन घंटागाड्या आणल्या आहेत. गल्ली बोळात जाऊ शकतील, अशा छोट्या घंटागाड्या आणण्यात आल्या आहेत. यापूर्वी शहरात 274 घंटागाड्या होत्या. त्यात 83 नवीन आणण्यात आल्याने 1 डिसेंबरपासून शहरात 396 घंटागाड्या सुरू झाल्या. आहेत. शहर स्मार्ट आणि कचरामुक्त होण्यासाठी अभ्यास केल्यानंतर थेट गल्ली बोळात जाऊ शकतील अशा आकाराने छोट्या घंटागाड्या कचरा संकलनासाठी दाखल झाल्या आहेत. तथापि, या घंटागाड्या महिलांची डोकेदुखी ठरत आहेत. उंची जास्त असल्याने महिलांचा हात पोहोचत नाही. त्यामुळे बर्याचदा कचर्याचा डबा थेट घंटागाडीत पडतो. ज्या महिलांची उंची कमी आहे त्यांना तर घंटागाडी कर्मचार्याचीच मदत घ्यावी लागते. शिवाय कचरा साठवण क्षमता कमी असल्याने एकाच गल्लीत घंटागाडी लगेच कचर्याने भरुन जाते. त्यामुळे ती खाली होऊन येण्याची वाट पाहावी लागत असल्याने नव्या घंटागाड्यांबद्दल महिलांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
अनेकदा कचरा टाकण्यासाठी महिलां घरातील लहान मुलांना पाठवितात. त्यांचा तर हात पुरुच शकत नाही. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नवीन घंटागाड्याचे अप्रुप वाटत असले तरी येणार्या अडचणींमुळे महिलांत नाराजीचे वातावरण दिसून येत आह.े