नाशिक

कचरा टाकण्यासाठी आता स्टूल घेऊन जायचे का?

नवीन घंटागाड्यांची उंची ठरतेय डोकेदुखी
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी  आणलेल्या नवीन घंटागाडयांबाबत महिलांच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. आकाराने लहान असलेल्या या घंटागाड्यांची उंची जास्त असल्याने कचरा टाकण्यासाठी महिलांचा हातच पुरत नसल्याने कचरा टाकण्यासाठी उभे राहण्यास आता स्टूल किंवा खुर्ची घेऊन जायची का? असा सवाल महिलांकडून केला जात आहे.
शहरामध्ये घंटागाडी ठेकेदाराने नवीन घंटागाड्या आणल्या आहेत. गल्ली बोळात जाऊ शकतील, अशा छोट्या घंटागाड्या आणण्यात आल्या आहेत.  यापूर्वी शहरात 274 घंटागाड्या होत्या. त्यात 83 नवीन आणण्यात आल्याने  1 डिसेंबरपासून शहरात 396 घंटागाड्या सुरू झाल्या. आहेत. शहर स्मार्ट आणि कचरामुक्त होण्यासाठी अभ्यास केल्यानंतर थेट गल्ली बोळात जाऊ शकतील अशा आकाराने छोट्या घंटागाड्या कचरा संकलनासाठी दाखल झाल्या आहेत. तथापि, या घंटागाड्या महिलांची डोकेदुखी ठरत आहेत. उंची जास्त असल्याने महिलांचा हात पोहोचत नाही. त्यामुळे बर्‍याचदा कचर्‍याचा डबा थेट घंटागाडीत पडतो. ज्या महिलांची उंची कमी आहे त्यांना तर घंटागाडी कर्मचार्‍याचीच मदत घ्यावी लागते. शिवाय कचरा साठवण क्षमता कमी असल्याने एकाच गल्लीत घंटागाडी लगेच कचर्‍याने भरुन जाते. त्यामुळे ती खाली होऊन येण्याची वाट पाहावी लागत असल्याने नव्या घंटागाड्यांबद्दल महिलांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
अनेकदा कचरा टाकण्यासाठी महिलां घरातील लहान मुलांना पाठवितात. त्यांचा तर हात पुरुच शकत नाही. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नवीन  घंटागाड्याचे अप्रुप वाटत असले तरी येणार्‍या अडचणींमुळे महिलांत नाराजीचे वातावरण दिसून येत आह.े
Ashvini Pande

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

2 days ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

2 days ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

2 days ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

2 days ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

2 days ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

2 days ago