लाचखोर डॉक्टर जाळ्यात
नाशिक: प्रतिनिधी
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याचा मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपळगाव बसवंत येथील दोन डॉक्टर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.
धन्वंतरी हॉस्पिटल पिंपळगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येेेथील डॉक्टर आहेत,तक्रारदाराची आई यांचा हात फ्रॅक्चर झाला असल्याने त्यांना धन्वंतरी हॉस्पिटल पिंपळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांचे शासनाच्या महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन करून दिल्याच्या मोबदल्यात
7000/-रुपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम पंचसाक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 व कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल कामकाज सुरु आहे.