चांदवड देवळा मधून डॉक्टर राहुल आहेर, तर नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे
नाशिक/ काजी सांगवी ( वार्ताहर)
भाजपच्या 99 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे, यात नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे यांनाच पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे, पूर्व मधून राहुल ढिकले तर भावासाठी माघार घेऊनही चांदवड मधून राहुल आहेर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे,
नुकतीच पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर राहुल आहेर यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेऊन आपले बंधू केदार यांच्यासाठी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती परंतु पक्षाने पुन्हा एकदा डॉक्टर राहुल आहेर यांना उमेदवारी सुपूर्द केली आहे आजच भाजपाची पहिली यादी जाहीर झाली त्यामध्ये डॉक्टर राहुल आहेर यांची उमेदवारी निश्चित केली आहे त्यामुळे चांदवड मध्ये पुनश्च एकदा राजकारण तापायला सुरुवात झाली आहे डॉक्टर राहुलदारांच्या उमेदवारीने जे गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवार तयार झाले होते त्यांना जणू काही धक्काच बसला आहे