मनमाड: प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या बेजगाव येथे कुत्र्याने चावा घेतल्याने एका तरुणाचा तब्बल पाच महिन्याने मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी घडली आहे.सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान पुष्पराज हा तो एकुलता एक मुलगा होता.
याबाबत समजलेली माहिती अशी की बेजगाव लहाने वस्तीवरील येथील पुष्पराज दादाभाऊ लहाने(वय,१९) यास गेल्या पाच,सहा महिन्यापूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता.त्यानंतर त्याने तीन पैकी दोन इंजेक्शन घेतले होते तर एक घेतल्याचे राहून गेले होते.परंतु तो बरा ही झाला होता.असे बोलले जात आहे.मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी त्याला त्रास होऊ लागल्याने त्यास मनमाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता डॉक्टरांनी नाशिक येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला.मात्र दोन दिवस उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सायंकाळी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…