नाशिक :प्रतिनिधी
मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने मराठीची वाटचाल याविषयी उहापोह करण्यात येतो. त्यात कायमच मराठी भाषेची होणारी परवड याविषयी चर्चा करण्यात येते. मात्र असे असले तरी मराठी भाषेचा आॅनलाइन माध्यमावर वापर वाढल्याचे चित्र आहे. सोशल माध्यमातून लेखन करताना अनेक जण मराठी भाषेत लेखन करण्यास प्राधान्य देतात. तर मिम्समध्ये मराठी भाषेचा वापर वाढला आहे. तर अनेक जण पर्सनल ब्लाॅग सुरू करत मराठी भाषेतून लेखन करत असतात. त्यामुळे सोशल माध्यमावर मराठीचे अधिराज्य असल्याचे चित्र आहे. तर अनेक जण ऑनलाईन माध्यमातून मराठी भाषेचे पुस्तक वाचण्यास पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. अनेक गाजलेल्या कादंबऱ्या, गूढ कथा, प्रवास वर्णने, आत्मचरित्र, युद्धकथा, गुप्तहेर कथा, युरोपातील लेखकांची गाजलेली मराठी भाषेतील अनुवादित साहित्य, ललित लेखनासारखे साहित्य पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामध्ये अगदी शंभर ते साडेचारशे पृष्ठसंख्या असलेले वाङ्मय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, व. पु. काळे, रणजित देसाई, सुधा मूर्ती, रत्नाकर मतकरी या प्रतिभावान साहित्यिकांच्या साहित्यांचा आस्वाद वाचकांना घेता येत आहे. त्यामुळे ऑफलाइन माध्यमात मराठीचा वापर कमी होत असला तरी ऑनलाइन माध्यमावर मराठीचे वर्चस्व आहे.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…