देवयानी सोनार
अश्विनी पांडे
मराठी, हिंदी, दाक्षिणात्य अशा वेगवेळ्या भाषा आणि नाटक, मालिका, सिनेमा, वेबसिरीज अशा वेगवेगळ्या माध्यमातून अभिनयाची मुशाफिरी करणारे अभिनेते सचिन खेडेकर प्रेक्षकांसाठी सोनी मराठीवर कोण होईल करोपती? कार्यक्रम घेऊन येत आहेत. त्यानिमित्ताने ते म्हणाले, एक पाऊल पुढे जाताना, आपण सावधपणे एक पाऊल मागे येतो. त्यामुळेच आता मागे नाही राह्यच, असे म्हणत त्यांनी प्रेक्षकांना कोण होईल करोडपती कार्यक्रम पाहण्याचे आवाहन दै. गांवकरीशी संवाद साधताना केले..
कोण होईल करोपती? कार्यक्रमाविषयी?
* या सीझनला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. मनोरंजन दुप्पट असणार्या या कार्यक्रमात बक्षिसांची रक्कमही दुप्पट केली आहे. तसेच यंदाच्या सीझनमध्ये एक प्रश्न वाढवला आहे. आता सोळावा प्रश्न दोन कोटींसाठी असणार आहे. 29 मेपासून सोनी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे. तसेच ज्यांना कार्यक्रमाची निवडप्रक्रिया कधी सुरू झाली माहिती नव्हती अशा प्रेक्षकांना सहभागी होण्याची दुसरी संधी मिळणार आहे.
दाजीने केला शालकाचा खून, नाशिक हादरले
कोणत्या माध्यमात काम करायला आवडते?
* मला नाटकात काम करायला जास्त आवडते. कारण नाटकांतील अभिनयही लाइव्ह असतो आणि प्रेक्षकांचा प्रतिसादही लाइव्ह मिळतो. त्यामुळे आपल्याला अभिनयाची पोच पावती तत्काळ मिळते.
येत्या काळात प्रेक्षकांसाठी नवीन प्रोजेक्ट कोणते?
* सध्या 29 मेपासून सोनी मराठीवर कोण होणार करोडपती? सुरू होत आहे. त्याचप्रमाणे एका वेबसिरीजवर काम सुरू आहे. यांसह काही प्रोजेक्ट आहेत.
हिंदी चित्रपटातील कामाचा अनुभव?
* हिंदीत माझ्या आधीही अनेक मराठी कलावंतांनी उत्तम असे काम केले आहे. त्यामुळे मला हिंदीत काम करणे जास्त सोपे झाले.
दक्षिणात्य चित्रपटात काम करण्याचा अनुभव?
* दक्षिणात्य चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूप चांगला असतो. प्रत्येक कलावंताना आपला प्रेक्षक वाढावेत असे वाटते. दक्षिणात्य सिनेमे जगभरात पाहिले जातात. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत आपला अभिनय पोहचवणे सहज शक्य होते.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय; दोन वर्षाच्या चिमुकल्याला फेकले विहिरीत
कलावंतांना भाषेचा अडसर ठरतो का?
* प्रत्येक कलावंत नवीन काही तरी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे दुसर्या भाषेत काम करताना स्वतःला आव्हान असते. मात्र, हिंदी भाषेत काम करणे सोपे असले तरी दाक्षिणात्य भाषेत काम करणे जास्त कठीण जाते.
फॅन मूव्हमेंट?
* फॅन भेटत असतात. ते सांगतात तुमचा हा अभिनय खूप आवडला. त्यातली भूमिका नाही आवडली. फॅनकडून होणारे कौतुक कायमच लक्षात राहते.
वावी जवळ शिवशाही बस चालकाची बसमध्येच आत्महत्या
कोण होईल करोडपतीचा अनुभव?
अभिनेता म्हणून माझी प्रेक्षकांसमोर एक प्रतिमा आहे. ‘कोण होईल करोडपती’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर माणूस म्हणून मी कसा आहे हे जाते. कारण मी या कार्यक्रमात अभिनय करत नाही तर सूत्रसंचालन करतो.
दोन वर्षाच्या मुलाला फेकले विहिरीत
अभिनय क्षेत्रात येऊ पाहणार्या कलावंतांना काय संदेश द्याल?
* अभिनय क्षेत्रात करइर करायचे असल्यास त्याचे आधी शास्त्रोक्त शिक्षण घ्यायला हवे. सध्या अनेक विद्यापीठांत नाट्यशास्त्र पदवीचे शिक्षण देण्यात येते. शिक्षण घेऊन आले तर आपल्याला अभिनयातील बारकावे कळू शकतात आणि आपला अभिनय उत्तम होण्यास मदत होते.
कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर बलात्कार करुन निर्घृण खून