दिंडोरी :
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दोन वर्षाच्या चिमुकल्याला विहिरीत फेकून देत खून केल्याचा प्रकार कादवाम्हाळुंगी (ता. दिंडोरी) येथे घडला. पती विरोधात दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वर्षा अपसुंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती राजेंद्र छबू अपसुंदे (४३) हा चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. हा मुलगा माझा नाही, असे बोलत मानसिक छळ करत होता.
संशयिताने संशय घेत चिमुकल्या घनश्यामला हिसकावून घेत निवृत्ती निकम यांच्या विहिरीत फेकले. विहिरीत प्रेत तरंगत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी पोलिसांना दिली. राजेंद्र अपसुंदे यास अटक करण्यात अाली अाहे. पोलिस निरीक्षक पी. एस. वाघ तपास करत असल्याचे सांगण्यात आले.