महाराष्ट्र

ऑर्थोपेडिक सोयासायटीच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा डॉ. धुर्जड

डॉ. भुतडा यांची घोषणा
नाशिक  प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील अस्थिरोग तज्ञांची संघटना असलेल्या नाशिक ऑर्थोपेडिक सोसायटीची सण २०२३ – २४ या वर्षासाठी वार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. सदर निवडणुकीत डॉ. संजय धुर्जड यांची अध्यक्षपदी, डॉ. राजेंद्र खैरे उपाध्यक्षपदी, डॉ. गोपाळ शिंदे सचिव, तर डॉ. पुनीत शाह यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती निवडणुकीचे निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत भुतडा यांनी दिली. वरील चार पदांसाठी हे चार अर्ज आलेले असल्याने वरील उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले असे ते म्हणाले.
गेल्या वर्षी २०२२ -२३ मधील डॉ. धुर्जड व त्यांच्या टीमची कामगिरी बघता पुढील वर्षीसाठी हीच टीम पुन्हा बिनविरोध निवडून आली आहे. त्यांच्या कारकिर्दीत नाशिकला २०२४ – २५ च्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन अयोजनाचे यजमानपद मिळाले आहे. तसेच, राज्य पातळीवरील अनेक उपक्रमांत त्यांचा सहभाग नोंदवला गेल्याने, त्यांनाच पुन्हा संधी मिळाली आहे.
याच वर्षांत नाशिकमधून ३५ डॉक्टरांना महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे आजीव सदस्यता मिळाली आहे. नाशिक मधील अस्थिरोग तज्ञांच्या शैक्षणिक, व्यावसायिक, तसेच कौशल्य विकासासाठी कार्य करू व नाशिककरांच्या अस्थिरोग व सांध्यांच्या आरोग्यविषयक समस्या दूर करून त्यांना निरोगी व वेदनारहित जीवन जगण्यासाठी उपयुक्त असणारे जनजागृतीपर उपक्रम राबवणार आहे, असे मत डॉ. धुर्जड यांनी व्यक्त केले.
सचिव डॉ. शिंदे हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण संस्थेचे उपाधिष्ठाता असून, त्यामाध्यमातून महाराष्ट्रातील अस्थिरोग विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या स्नातकांसाठी ऑनलाइन शैक्षणिक उपक्रम राबवणार अशी माहितीही त्यांनी दिली.
नाशिकमधील अनेक अस्थिरोग तज्ञ आपापल्या परीने विविध माध्यमातून जनकल्याणकारी, सामाजिक उपक्रम राबवत असतात. सदर उपक्रम यापुढे संघटनेच्या माध्यमातून राबविले जातील. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांच्या प्रशिक्षणासाठी वेळोवेळी सेमिनार, प्रशिक्षण शिबिरे, प्रात्यक्षिके व व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहे, तसेच अस्थिरोग क्षेत्रात नवव्यावसायिकांसाठी सुरक्षित व पोषक वातावरण निर्माण करण्यावर भर दिली जाणार आहे अशी ग्वाही डॉ. खैरे यांनी दिली.
पुढील वर्षी होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे यशस्वी आयोजनासाठी सर्वच सभासद प्रयत्नशील असणार आहे, असे मत अधिवेशनाचे आयोजन सचिव डॉ. प्रशांत सोनवणे यांनी व्यक्त केले. नाशिकमधील ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे सर्वच सभासद यात सहभागी होऊन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात व्यख्याते, मानद शिक्षक, मार्गदर्शक, यशस्वी व्यावसायिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
येणाऱ्या काळात संघटनेचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण अवलंबून अधिकाधिक सदस्यांना संधी दिली जाणार आहे, तसेच अनेक सदस्यांनी संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने नवीन पदांवर सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. धुर्जड यांनी बोलून दाखवला.
त्यानुसार डॉ. मयूर सरोदे यांची सह-सचिव व डॉ. विशाल कासलीवाल यांची सह-खजिनदार पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच इतर समित्यांचे गठन पुढील काही दिवसांत करणार असल्याचे सांगितले.
निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी निवडणूक अधिकारी डॉ. भुतडा यांना डॉ. काकतकर, डॉ. कनौजिया, डॉ. संजय गणोरकर, डॉ. नितीन हिरे, डॉ. मुकेश अग्रवाल, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. निलेश शेलार, डॉ. राजेश सोनवणे आदी सदस्यांनी सहकार्य केले. डॉ. धुर्जड यांच्या पुनर्निवड झाल्याने सर्व थरातून त्यांचेवर अभिनंदन केले आहे.
Devyani Sonar

Recent Posts

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला गती

मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्‍यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…

15 minutes ago

जातो माघारी पंढरीनाथा…

महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…

19 minutes ago

जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोर‘धार’; धरणांतून विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…

24 minutes ago

सरदवाडी धरण ओव्हरफ्लो; भोजापूरच्या पूरचार्‍यांना सोडले पाणी

आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…

29 minutes ago

किचन ट्रॉलीच्या कंपनीला भीषण आग

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…

33 minutes ago

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…

1 hour ago