सीटूच्या राज्य अध्यक्षपदी डॉ.डी.एल.कराड

 

नाशिक : प्रतिनिधी

सीटुच्या राज्य अध्यक्षपदी डॉ. डी.एल. कराड यांची फेरनिवड करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड मध्ये झालेल्या सीटुच्या  राज्य अधिवेशनात डॉ.डी.एल.कराड यांची निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी एम.एच.शेख,  खजिनदारपदी के.आर.रघु तसेच उपाध्यक्षपदी सीताराम ठोंबरे,माजी नगरसेविका ऍड. वसुधा कराड, कल्पनाताई शिंदे यांची निवड करण्यात आली.  सीटुचे राज्य सचिव म्हणून देविदास आडोळे,  सिंधुताई शार्दुल यांची निवड केली आहे. राज्य जनरल कौन्सिलच्या सदस्यपदी संतोष काकडे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार, संतोष कुलकर्णी, मोहन जाधव , रामदास पगारे,विजय विशे, हिरामण तेलोरे, रमेश जगताप, हरिभाऊ तांबे, विजय दराडे,  सुलक्षणा ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे.  या अधिवेशनामध्ये राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नावर 2023 मध्ये आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यात फोफावत असलेली कंत्राटी पद्धत, राज्य सरकारकडून व केंद्र सरकारकडून होणारे अंगणवाडी आशा शालेय पोषण इत्यादी योजना कर्मचार्‍यांची पिळवणूक राज्यातील चार कोटी असंघटित कामगारांना सेवा शर्ती व सामाजिक सुरक्षा लागू करणे , कंत्राटी,ठेकेदारी, मानधनी, शिकाऊ पद्धतीने काम करणार्‍या कामगारांना त्याच आस्थापनेत  कायम करणे व सर्व 60 वर्षे वयावरील प्रत्येकाला 10 हजार रुपये दरमहा पेन्शन या मागण्यावर सीटु लक्ष केंद्रित करणार आहे.

 

हे ठराव मंजूर

तीन दिवस चाललेल्या अधिवेशनात कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा,देशी-विदेशी भांडवलदारांना राष्ट्रीय संपत्ती कवडीमोलाने विकण्याचे धोरण मागे घ्या, दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन कायद्याने निश्चित करा,कंत्राटी मानधनी शिकाऊ कामगारांना त्याच आस्थापणे मध्ये कायम करा, यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा व सुधारित किमान वेतन लागू करा, घर कामगारांना कामगार कायदे व सामाजिक सुरक्षा लागू करा, सर्वांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा द्या, महाराष्ट्रातील औद्योगिक प्रकल्प गुजरातला पळविण्याचे कारस्थान बंद करा, कामकाजी महिलांचे शोषण थांबवा, दलित आदिवासी महिलांवरील अत्याचार रोखा, जातीय धर्मांध शक्तीचा बिमोड करा, राज्यपाल कोषारी यांना हटवा ,लोकशाही व देशाच्या संविधानाचे रक्षण करा व कामगार शेतकरी शेतमजूर यांचा 5 एप्रिल 2023 रोजी संसदेवरील विराट मोर्चा यशस्वी करा या विषयावरील ठराव करण्यात आले.

सभेला सीटचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार तपन सेन, सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड ,राज्य उपाध्यक्ष नरसय्या आडम ,किसान सभेचे उपाध्यक्ष उदय नारकर ,सीटू सरचिटणीस एम.एच.शेख, सीटुचे सेक्रेटरी आ. विनोद निकोळे, अंगणवाडीच्या नेत्या शुभा शमीम, बांधकाम कामगारांचे नेते भरमा कांबळे शिवाजी मगदूम उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *