नाशिक: प्रतिनिधी
ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. मूळचे कोल्हापूर येथील असलेले नारळीकर हे विज्ञान कथाही मोठ्या रंजकतेने लिहीत. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.