पंचवटी: प्रतिनिधी
सुयोग हॉस्पिटल चे डॉ. कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या हल्लेखोरस जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे, काल रात्री डॉ, राठी यांच्यावर रुग्णालयात कोयत्याने सपासप 18 वार करून फरार झाला होता, त्याला सीसीटीव्ही च्या फुटेज वरून शोध घेऊन अटक करण्यात आली आहे, राजेंद्र मोरे असे या हल्लेखोराचे नाव असून त्याला आडगाव भागातून ताब्यात घेण्यात आले आहे.