वैद्य विक्रांत जाधव यांच्या “आयुर्वेद चिकित्सा टेलीमेडीसीन द्वारे” शोध प्रबंधाला जागतिक आयुर्वेद कॉंग्रेस मध्ये प्रथम पारितोषिक
नाशिक : प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने वैद्य विक्रांत जाधव यांचा सन्मान करण्यात आला. जागतिक आयुर्वेद कॉंग्रेस मध्ये नाशिक चा सन्मान सुरगाणा कोविड चिकित्सा चर्चेत वैद्य विक्रांत जाधव यांचा सावानातर्फे सत्कार करण्यात आला.
दि. ८ ते ११ डिसेंबर, २०२२ रोजी झालेल्या जागतिक आयुर्वेद कॉंग्रेस मध्ये आयुर्वेद तेली मेडिसिन द्वारे चिकित्सा हा शोध निबंध सुरगाणा येथे केलेल्या चिकित्सा पद्धतीवर आधारित होता. या प्रबंधाला नुसतेच निवडल गेले नाही तर ह्या परिषदे मध्ये प्रबंधास सादरीकरणात प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. ह्या प्रबंध सादरीकारणास अनेक संशोधक मान्यवरांनी व वैद्यकीय शिक्षक, प्राध्यापक यांनी गौरवविले, निबंध हा सुरगाणा येथीन कोविड निर्मुलनाच्या धर्तीवर केलेल्या संशोधन व कृती यावर असून या उपक्रमाला मा.आ.नितीन पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, डॉ. कपिल आहेर, जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. लीना बनसोड व सुरगाणा येथील सर्व वैद्यकीय कर्मचारी यांचा सहभाग होता.
सार्वजनिक वाचनालय तर्फे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या हस्ते आणि सर्व कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
नाशिक शहर सुरगाणा तालुका व एकूणच गावाचे नाव वैश्विक पटलावर पोहचवून नाशिक मध्ये असा टेली मेडिसिनचा आधुनिक यशस्वी प्रयोग सुरगाणा सारख्या आदिवासी ग्रामीण भागात होतो ही कौतुकाची बाब आहे असे गौरवोद्गार अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी काढले. ह्या प्रबंधाचा उपयोग चिकित्सा पद्धती आणि आयुर्वेद विश्वातील काना कोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल हे नक्की प्रबंधाचे पहिले पारितोषिक अपेक्षित होते व नव्हते. ही नाशिक या गावातून गावाचा असलेला हा प्रबंध एक संशोधन वैश्विक स्तरावर कार्य कुशलता, आधुनिकता आणि शास्त्रीय यश यांचा संगम असून या परितोषीकाला नाशिक या माझ्या गावाला अर्पण करून नाशिक मधून अशी संशोधने नवीन आयाम वैश्विक स्तरावर जावे ही आंतरिक ईच्छा आहे. सार्वजनिक वाचनालय हे सांस्कृतिक व संस्कार केंद्र असून आपल्या घरातला हा पहिला सन्मान नेहमीच लक्षात राहणारा आहे असे भावना याप्रसंगी बोलतांनावैद्य विक्रांत जाधव यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन देवदत्त जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन अॅड. अभिजित बगदे यांनी केले. यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष गिरीश नातू, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, प्रा.सोमनाथ मुठाळ जयेश बर्वे, सौ.प्रेरणा बेळे, तसेच व्यवस्थापक दिलीप बोरसे, सहा. व्यवस्थापिका सौ. योगिनी जोशी व सावाना सेवकवृंद उपस्थित होता.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…