मंदिरात ड्रेसकोड लागू करणे हा मूर्खपणा, पुजारी अर्ध नग्न असतात त्याचे काय? छगन भुजबळ यांची टीका

मंदिरात ड्रेसकोड लागू करणे हा मूर्खपणा, पुजारी अर्ध नग्न असतात त्याचे काय?
छगन भुजबळ यांची टीका
नाशिक: मंदिरात ड्रेस कोड लागू करणे हा निव्वळ मूर्खपणा आहे मंदिरांमधील बसलेले पुजारी हे देखील अर्ध नग्न अवस्थेत असतात त्याचे काय असा सवाल माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. महाराष्ट्र सदनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करताना अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे पाठविल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली . हा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली .राज्यात निवडणुका कधीही होऊ द्या सर्वच पक्ष तयार असतात, असे ते म्हणाले .

सध्या मंदिरांमधील ड्रेस कोड वरून वेगवेगळे दावेप्रति दावे केले जात आहेत सप्तशृंगी गडावरील मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याच्या हालचाली विश्वस्तांनी सुरू केला आहेत, मात्र ड्रेस कोड लागू करताना मंदिरामधील बसलेले पुजारी अर्ध्या नग्न असतात त्यांनाही एखादा सदरा घालण्याची सक्ती करावी ,अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *