चालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे -नितीन मैंद

 

सुरक्षितता अभियानाचे एसटीच्या विभागीय कार्यालयात उद्घघाटन

रस्ते सुरक्षा अभियान 25 जानेवारीपर्यंत

नाशिक ः प्रतिनिधी

अपघातामुळे कधीही न भरून येणारी हानी होते.चालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे.एक अपघात झाला तर खर्च,जीवतहानी होते.एसटी अपघात घडू नये यासाठी काळजी घ्यावी.रस्त्यावरील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे,पूल ,रस्ता दूभाजक,रस्ता पार करणे यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.असे अध्यक्ष नितीन मैंद उप महा व्यवस्थापक यांनी सुरक्षितता अभियानाचे एसटीच्या विभागीय कार्यालयात उद्घघाटनप्रसंगी चालकांना मार्गदर्शन केले.

बुधवार (दि 11 )चालक प्रशिक्षण केंद्र, विभागीय कार्यालय रा. प. नाशिक येथे सुरक्षितता अभियान 2023 यां कार्यक्रमाचा उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नितीन मैंद उप महा व्यवस्थापक रा. प. नाशिक व औरंगाबाद नियंत्रक समिती हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे वासुदेव भगत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हे उपस्थित होते.

कार्यक्रमा चे प्रास्ताविक अरुण सिया विभाग नियंत्रक रा. प. नाशिक यांनी केले. प्रास्ताविक करताना त्यांनी सुरक्षितता मोहीम का घेतली जाते यां बाबत माहिती दिली तसेच अभियान 11 ते 25 जानेवारी 2023 यां कालावधीत होणार असल्याचे नमूद केले.

प्रमुख पाहुणे वासुदेव भगत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सुरक्षितता मोहिमे निमित्त उपस्थित सर्व महिला चालक व पुरुष चालक यांना अपघात घडू नयेत यां बाबत  मार्गदर्शन केले. सदर कार्यकमास कैलास पाटील विभागीय वाहतूक अधिकारी, दादाजी महाजन विभागीय वाहतूक अधीक्षक,  विजय झगडे कर्मचारी वर्ग अधिकारी तसेच सर्व चालक बंधू भगिनी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *