कसारा विभागातील फुगाळा येथे ड्रोनची माहिती मिळताच पोलिस धावले

शहापूर ः प्रतिनिधी

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राइक केला. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले होते, मात्र भारताने वायुदलाने पाकिस्तानचे डॉल हवेतच जिरवले. मात्र देशभरात अलर्ट जारी करण्यात आला होता हवेतील ड्रोन वर ही नजर ठेवण्यात येत होती. मुंबईतील साकीनाका परिसरात अज्ञात ड्रोन उडाल्याची बातमी पसरली होती पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले मात्र कुठेही दोन आढळून आला नसूनही ही अफवा असल्याचे समजले आज ठाणे जिल्ह्याच्या शहापूर कसारा भागातील फुगाळे गावात आज ड्रोन आढळून आल्याने खळबळ उडाली होती. डोंगराळ भागातील मुलं फिरायला गेले असताना त्यांना हा ड्रोन दिसला होता. या ड्रोनबाबत माहिती मिळतात घटनास्थळी कसारा पोलीस दाखल झाले. त्यानंतर घटनेची कसून चौकशी केली असता हा ड्रोन जलसंपदा विभागाचा असल्याची माहिती समोर आली आहे. वैतरणा धरणाचा सर्वे चालू असून दोनच्या माध्यमातून सर्वे करत असताना बाहेर गेल्याने पडला असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या ड्रोन पोलिसांनी ताब्यात घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *