दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले

महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना

सातपूर : प्रतिनिधी
सातपूर नाशिक मध्ये पतीने पत्नीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून  पेटवून दिल्याची घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास, सातपूर येथील श्रमिकनगर सातमाऊली चौक परिसरात राहणाऱ्या इसमाने दारूच्या नशेत बायकोवर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिले.सदर घटना शेजारी राहणाऱ्या नागरिकांना समजली. नागरिकांनी तात्काळ पेटलेल्या महिला च्या अंगावर पाणी ओतून आग विझवली. परंतु तो पर्यंत सदर महिला ४० टक्के भाजून गंभीर जखमी झाली आहे.  महिलेला उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी तात्काळ नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.सातपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *