दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले
महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना
सातपूर : प्रतिनिधी
सातपूर नाशिक मध्ये पतीने पत्नीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिल्याची घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास, सातपूर येथील श्रमिकनगर सातमाऊली चौक परिसरात राहणाऱ्या इसमाने दारूच्या नशेत बायकोवर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिले.सदर घटना शेजारी राहणाऱ्या नागरिकांना समजली. नागरिकांनी तात्काळ पेटलेल्या महिला च्या अंगावर पाणी ओतून आग विझवली. परंतु तो पर्यंत सदर महिला ४० टक्के भाजून गंभीर जखमी झाली आहे. महिलेला उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी तात्काळ नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.सातपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे
संडे अँकर तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या…
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…