नाशिक

बस चालकाच्या सतर्कतेमुळे अग्निकांडची दुर्घटना टळली

नाशिकरोड : प्रतिनिधी
त्रंबकेश्वर येथून शिर्डीला जाणाऱ्या बसमधील बॅटरीच्या वायरचा शॉर्टसर्किट झाल्याने अचान बसच्या काही भागातून धूर निघू लागला. बस पेट घेणार  समजताच बस चालकाने सतर्कता दाखवत तातडीने बस थांबवत प्रसंगावधान राखून बसमधील प्रवाशांना खाली उतरविले. त्याचवेळी पाठीमागूनच शहर वाहतुकीचे पोलीस येत होते त्यांनीही तातडीने मदत करून बस मधील प्रवाशांना उतरवले व त्यामुळे मोठी दुर्घटना टळली अन्यथा नाशिक शहरात पुन्हा एक मोठे बस अग्नी कांड झाले असते.
याबाबत माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर वरून शिर्डी कडे एम एच 14 बी टी 41 17 या क्रमांकाची बस जात होती सदरची बस नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या उपनगर नाक्याजवळ येताच बसच्या बॅटरी मधील वायर लीग झाली व त्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला सदरची घटना काही क्षणातच बस चालकाला कळली त्यानंतर बस चालकाने तातडीने बस थांबविली तसेच पाठीमागून शहर वाहतुकीचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम हे सुद्धा आपल्या वाहनाने येत होते त्यांना ही गाडी घटना समजतात त्यांनी तातडीने आपल्या सहकार्यासमवेत बसमधील प्रवाशांना खाली उतरविले त्यानंतर लगेच पाण्याच्या बंबाला पाचारण केले व संपूर्ण बस मध्ये व बाहेर धूर निघत असताना पाण्याचा मारा करून सदर बस ची आग विझविली त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.
नाशकात यापुर्वी आग दुर्घटना
या अगोदर काही महिन्यापूर्वी हॉटेल मिरची जवळ खाजगी बस पेटून लागलेल्या आगीत तेरा प्रवासी मृत्युमुखी झाले  होते . दा प्रवासी का मृत्युमुखी पडले होते. तसेच नाशिक पुणे महामार्गावर पळसे  येथे सुद्धा महामंडळाची बस पेटून दोन चाकी चालक जळून ठार झाले होते. या दोन्ही घटना ताज्या असतानाच ही मोठी घटना होता होता टळली. सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचल्याने चालकाचे कौतुक केले जात आहे. या घटनेनंतर सदर ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
Ashvini Pande

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

18 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

19 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

19 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

19 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

19 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

19 hours ago