वर्धापनदिन विशेष

दुग्धव्यवसायात पॉवर आणणारे दीपक आव्हाड

– देवयानी सोनार

नाशिकमधून दीपक आव्हाड या तरुणाने डेअरी पॉवरचा उद्योग सुरू केला. या उद्योगाने अल्पावधीतच राज्यभरात आपली छाप सोडली. शेतकरी ते ग्राहक या साखळीत महत्त्वाचा दुवा ठरलेल्या या उद्योगाने नाशिकच्या अर्थकारणाला खर्‍या अर्थाने पॉवर दिली आहे. कांदा, तांदूळ, रसाळ फळं, भाजीपाला, द्राक्ष, फुलं यांचा दबदबा तर आपल्या नाशिकने निर्माण केलाच आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून नाशिकने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतही आपले पाय घट्ट रोवले आहेत. या दूध उद्योगाच्या विश्वात नाशिकच्या प्रवासातलं एक नाव म्हणजे दीपक आव्हाड आणि डेअरी पॉवर.
काही बँकांनी त्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी नकार दिला. त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अनेक नातलगांनी त्यांना हा उद्योग नको असं म्हणून समजूतही काढली; पण नाशिकची वेगळी ओळख निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलेल्या दिपक यांनी मागे फिरून पाहिलं नाही. अनेक खस्ता खाऊन डेअरी पॉवर लिमिटेड नावाने रोवलेलं हे इवलंसं रोपटं आता विशाल वटवृक्षात बहरले आहे.
नोकरी की व्यवसाय याबद्दल सुरक्षित मार्ग कंम्फर्ट झोन नोकरीचा निवडला जातो.व्यवसायाऐवजी नोकरीसाठी अनेकमार्गाने प्रयत्न करणार्‍या तरुणांना नाशिकच्या दीपक आव्हाड यांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन यशस्वी होण्याचा मार्ग दाखविला आहे.
2016मध्ये डेअरी पॉवरची स्थापना केली.2011 ते 16 पर्यंत दुग्ध व्यवसाय
तोट्यात का जातो याचा अभ्यास केला. जन्म आणि शिक्षण जरी मुंबईचे असले तरी मी नाशिकचा असल्याने चॅलेंजेस स्वीकारण्याची आवड होती. दुग्धव्यवसायाची इंडस्ट्री डबघाईला आलेली असल्याने हे चॅलेंज स्वीकारले. गरीबीतून वरती आल्याने प्रस्थापित व्यवसाय करण्यापेक्षा आव्हाने स्वीकारून माझ्यासारख्या अनेक लोकांना उभे करण्याचे माझे स्वप्न होते.मला अडचणीत कोणी आधार दिला नाही पण मी होतकरूना नक्कीच हात देवून चांगले उद्योजक घडविणार हे माझे स्वप्न आहे.
एक वर्षात अडीच लाख लिटर दूधाचा बाजार प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट असून, जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम झाल्यावर शेतकर्‍यांना हमीभाव देण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी महाराष्ट्रभर बाजारपेठ उपलब्ध करून देणे यासाठी माझी टीम गेले चार वर्षे काम करीत आहे. शेतकर्‍यांना हमीभाव देण्यासाठी स्थिर बाजार असणे गरजेचे आहे. सध्या दुसर्‍या ठिकाणाहून दूध संकलन माझ्यासाठी नुकसानदायक असले तरी जेव्हा अडीच लाख दुधाला बाजारपेठ उपलब्ध करून देईल त्यावेळी ते अडीच लाख लिटर दूध नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून घेतले जाईल आणि शेतकर्‍यांना हमीभाव मिळेल.शेतकरी आणि थेट ग्राहक असे मॉडेल असणार आहे. यासाठी जो मुलगा आईवडिलांना सांभाळू शकतो तो शिक्षण असो किंवा नसो तो मुलगा कंपनीचे सर्व कामगार सांभाळू शकतो ही माझी धारणा असल्याने अशी मुलांचे शिक्षण न बघता त्यांचे कर्तृत्व पाहून त्यांना रोजगार देणार आहे. नाशिक जिल्ह्यातील तरूण हा जिल्ह्याच्या बाहेर न जाता जिल्ह्यात राहिला तरच फायदा होईल. असेच राज्यातील तरूण त्या त्या जिल्ह्यात राहिला तर त्या त्या जिल्ह्याला फायदा होणार आहे.
गुरूपौर्णिमेनिमित्त 12 एक्सयूव्ही वाहने कर्मचार्‍यांना भेट देण्यात नाशिकच्याच महिंद्रा कंपनीची निवड केली. महिंद्रा कंपनीमुळे लघुउद्योजक तयार झाले.त्यामुळे नाशिकची भाग्यरेषा बदलली.आपला व्यवसाय आपल्या वर्तुळातच राहिला पाहिजे याहेतूने माझे प्रयत्न आहेत.भेट देतांना उच्चशिक्षित आणि चांगल्या पदाच्या कर्मचार्‍यांची निवड केली जाते. मी सर्वसामान्य अशिक्षीत कर्मचार्‍यांना गाड्या भेट दिल्या. मी बेंचमार्क सेट केला आहे. इंडस्ट्रीचे शिक्षण असलेलाच इंडस्ट्री चालवू शकतो असे नाही. माझ्या डेअरी पॉवरमध्ये 90 टक्के इंडस्ट्रीशी संबधित नसलेले लोक आहेत आणि त्यांनी या व्यवसायाची आतापर्यंतची वाटचाल केली आहे.
डेअरी पॉवर व्यवसायात इंडस्ट्रीशी संबध नसलेले लोक निवडले आहेत. प्रत्येक गोष्ट पडून उभे राहण्यास शिकलो आहे. या पाच वर्षाच्या प्रवासात इंडस्ट्री कशी चालते हे आम्हाला माहिती नाही परंतु हा व्यवसाय कसा चालवता येईल याबद्दलच विचार केला आहे.पुस्तकी ज्ञानासाठी माणसे आहेत परंतु व्यावहारीक कामाचा अनुभव उच्चशिक्षित माणसांपुढे नक्कीच दोन पावले पुढे आहेत.
क्वॉलिटी,गुणवत्ता दिली तरच व्यवसाय टिकवला जावू शकतो, हे कोणतीही जाहिरात न करता, प्रत्येकाच्या तोंडी नाव होणार यासाठी कटीबद्ध आहोत.
स्पर्धा ही स्वतःशीच
स्पर्धेत पळत असतांना आजूबाजूला न बघता मी एकटाच आहे. याभावनेने मी जिंकण्यासाठी पळतो.कोणाला हरविण्यासाठी पळत नाही.स्पर्धा मी मानत नाही.स्पर्धेत बाकीच्यांचा अभ्यास जास्त केला जातो.हरविण्यासाठी कोणी नाही स्पर्धा ही आपली आपल्याशीच आहे. याभावनेने पळालो तर शंभर टक्के जिंकतो.
कुटुंबाची पार्श्‍वभूमी
एकत्र कुटुंबपद्धती असल्याने चार काका आणि वडील असे पाच जण मुंबईत वास्तव्यास आहेत.1970 ला आजोबांनी नाशिक सोडून मुंबईत पोस्टमन म्हणून नोकरी मिळविली. वडीलोपार्जित जमीन सिन्नर पास्ते गावात आहे. दुसर्‍या पिढीने प्रत्येकाने वेगवगळे क्षेत्र निवडले.मला पहिल्यापासून नाशिकची ओढ होती.नाशिकला व्यवसाय सुरू करायचे ठरविल्यावर काकांनी(अशोक आव्हाड)पहिल्या पिढीने नोकर्‍या केल्या दुसर्‍या पिढीने व्यवसाय करावा यासाठी प्लॉटफार्म तयार करून दिला.काकांचा अनुभव आणि आईचे वडील (खंडूशेठ सानप) यांचा राजकीय वारसा या दोघांचे माहिती आणि मॅन पॉवर यांचा मेळ घडवून आणला.आणि त्यामुळे माझ्यासाठी या गोष्टी सोप्या होत गेल्या.
पिकेल तेथेच विकणार हा ध्यास
आपणच पिकविणार आणि आपणच विकणार या ध्येयामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तरूण हा स्थिर होईल. साडेतीन ते चार हजार रोजगार उपलब्ध होतील.गायीला देव,माता मानतो तो व्यवसाय तोट्यात कसा असू शकेल.प्रत्यक्षात दुधाचा बाजार उभा करणे,व्यवसायाची उंची गाठणे यासर्व गोष्टी पुढील एक वर्षात पूर्ण होतील.त्यानंतर रोजगार उपलब्ध करण्यावर भर असेल,शेतकर्‍यांशी संबधित रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर असणार आहे. म्हणजे समतोल साधता येईल. शेतकरी दूध संकलित करीत आहे आणि विकणाराही आपलाच माणूस आहे. हे विकसित करायचे आहे.
कामगारांचे स्वप्न पूर्ण करण्यात यश
माझे शिक्षण डिप्लोमा मॅकेनिकल झाले.मॅकेनिक म्हणून मला नोकरी लागली. नोकरीच्या ठिकाणी कामाचे समाधान मिळाले नाही.त्यामुळे जॉब सोडला.त्यामुळे घरच्यांची नाराजी झाली. पुन्हा गावाकडे येणे माझ्यासाठी आव्हान होते.नोकरी करून माझ्या गरजा आणि अपेक्षित उत्पन्न गेल्या काही वर्षात मिळालेले आहे.माझ्या या व्यवसायात यापुढील मिळेल ते उत्पन्न मला बोनस समजून माझ्या सारखे व्यावसायिक,कर्मचारी घडवायचे आहेत.26/11 च्या हल्ल्यात रतन टाटांनी आपला कर्मचारी जपला. हॉटेलमधील असो वा रस्त्यावरील व्यवसाय करणारा प्रत्येकाचा विचार करून मदत केली. हा विचार करून आपणही असे का करू नये याबद्दल विचार आला.म्हणून माझी योजनाच अशी बनविली माझ्या प्रत्येक कर्मचार्‍याला मी जपतो. प्रत्येकाला गाडी, घर आणि पुढे जाण्याची संधी,पर्याय उपलब्ध करून दिली पाहिजे. माणूस आणि नाव जपले पाहिजे.
नाशिकमध्ये 30 आऊटलेट आहे.100 आऊटलेटचे ध्येय आहे. फ्रॅन्चायजी देण्याचा विचार अतिशय काळजीपूर्वक घेणार आहे. जे कोणी फ्रॅन्चायजी घेतील त्यांना चांगला नफा मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.सर्व गोष्टींचा विचार करूनच फ्रॅन्चायजी दिली जाईल. राजकारण हे पाच वर्षानंतर बदलते.कंपनी ,ब्रँड ,नाव उभे करणे सोपे नाही. राजकारणात परिस्थितीनुसार बदलते. तसा व्यवसाय योजना, रणनीतीवर चालतो.मुंबईत समुद्रकिनारी राहिलेलो असल्याने मला प्रवाहाविरुद्ध जाण्यास आवडते.कोविडमध्ये कोणत्याही कर्मचार्‍यांचे पगार वेळेवर केला.कोरोनाची झळ बसू दिली नाही.कोरोनाला संकट म्हणून नाही तर संधी म्हणून पाहिले. शेतकर्‍यांमध्ये आणि व्यवसायात एवढी ताकद आहे की कोविड सारखे संकट येऊनही शेतीसंबधित व्यवसाय एक दिवसही बंद नव्हता.त्यामुळे डेअरी पॉवरच्या दीपक आव्हाड यांनी टाटांनी जे काम केले तसेच काम करण्याचा प्रयत्न केला.
ऑनलाइन मार्केटशी स्पर्धा नाही
माझे ग्राहक हे खेडेगावातील शेतकरी आणि साधारण माणूस आहे.हा व्यवसाय प्रादेशिक आहे.राष्ट्रीय किंवा ग्लोबल नाही.ऑनलाईनचे फॅड शहरात अधिक आहे.ऑनलाइन व्यवसाय हे काही माझे साध्य नाही त्यामुळे प्रत्येक गावामध्ये ,घरामध्ये महाराष्टातील सगळ्या गावखेड्यांमध्ये डेअरी पॉवरची पॉवर असल्याने ऑनलाइनची अडचण नाही.
चव डेअरी पॉवरची
चव डेअरी पॉवरची ओळख आपल्या नाशिकची ही ओळख आपोआप राज्यातील तीस जिल्ह्यात पोहचविण्यासाठी नाशिक रजिस्टर असलेल्या 150 गाड्या आहेत. एम एच 15 धोरण राबविल्याने नाशिक रजिस्ट्रेशन असलेली एम एच 15 गाडी प्रत्येक ठिकाणी जातांना डेअरी पॉवर आणि नाशिकची ओळख आपोआप तयार होण्यास मदत होते. नाशिक जिल्हा मोठा करणे हे आमचे ध्येय आहे.माझा प्रत्येक कर्मचारी हा माझ्या परिवारातील सदस्यच आहे. त्यामुळे माझ्याकडे काम करणार्‍या प्रत्येक माणसाकडे घर, गाडी आणि पैसा हे असणं आवश्यकच आहे. माझ्या प्रत्येक माणसाकडे गाडी असणं ही काळाची गरज आहे. ही संधी मला कुणी दिली नाही म्हणून मी या सदस्यांना दिली आहे. जर एक दिपक आव्हाड उभा राहिला तर आज 750 लोकं उभे राहतात, तर असे जवळपास मला 100 दीपक आव्हाड उभे करायचे आहेत. तरच आपण नाशिकसाठी काहीतरी परिवर्तन घडवू शकू आणि एकूणच या माध्यमातून नाशिक मोठं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
गुरुपौर्णिमेची अनोखी भेट
नुकतीच डेअरी पॉवर या कंपनीने आपल्या 12 कर्मचार्‍यांना महिंद्रा एक्सयुव्ही 300 या कारचे गिफ्ट दिले आहे. महिंद्रा एक्सयुव्ही कारची किंमत 12 लाख 60 हजार रुपये एवढी असून तब्बल 12 कर्मचार्‍यांना तीन रंगात उपलब्ध असलेली ही कार देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. आपल्या गुरुविषयी आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. कंपनीचे सर्व कर्मचारी हे कंपनीसाठी गुरुच आहेत, अशी भावना व्यक्त करीत कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी संचालक दिपक आव्हाड यांनी कर्मचार्‍यांना सुखद धक्का दिला आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…

13 hours ago

शिंदे टोलनाक्यावर कारला आग

शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…

15 hours ago

मनपा आयुक्त पदाबाबत मोठा ट्विस्ट, कार्डिलेची बदली रद्द, मनीषा खत्री यांची नियुक्ती

नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…

21 hours ago

दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक

दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…

1 day ago

नाशिक मनपा आयुक्तपदी राहुल कर्डीले

नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…

3 days ago

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

बराजकमल एंटरटेनमेंट'ची दमदार घोषणा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट…

3 days ago