सिन्नर ः प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील दुशिंगवाडी येथे काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने शेतात चारा काढणार्या पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
उज्ज्वला प्रदीप ढमाले असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. सायंकाळी पाच वाजेपासून सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात सायाळे, मळढोण, पाथरे, मिरगाव, दुशिंगवाडी भागात विजांचा कडकडाट सुरू होता. जोराने वाहणारे वारे व पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. दुशिंगवाडी शिवारात पानमळा रस्त्यावर ढमाले वस्ती असून, प्रदीप ढमाले कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. पावसाळी वातावरण तयार झाल्याने उज्ज्वला ढमाले व त्यांची जाव माया प्रकाश ढमाले या दोघी एक किमी अंतरावर असलेल्या शेतात जनावरांसाठी चारा काढत होत्या. त्या दरम्यान प्रचंड कडकडाट करत वीज कोसळली. जीव वाचवण्यासाठी दोघी दोन दिशांना झाडाच्या आडोशाला धावल्या. मात्र, उज्ज्वला यांना कोणतीही संधी मिळाली नाही. अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना समजल्यावर नातेवाईक व /-.. 4
नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…