स्मार्ट मोबाइलवरुन ई – पीक पाहणी पूर्ण करावी- घोरपडे

शेतकऱ्यांनी अँड्रॉइड स्मार्ट मोबाईलवरुन ई पिकपाहणी  पूर्ण करावी- तहसीलदार घोरपडे

लासलगाव : प्रतिनिधी

“माझी शेती माझा सातबारा मीच लिहीणार माझा पिकपेरा” या महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागाच्या नाविन्यपुर्ण योजनेमार्फत ई पीक पाहणी शेतकरी खातेदार यांनी तलाठी कार्यालयात न जाता स्वतःच्या शेतातील पिकांची ७/१२ वर नोंदणी स्वतःच्या मोबाईलवर ई पिक पाहणी व्हर्जन २ हे ऍप डाऊलोड करुन अँड्रॉइड स्मार्ट मोबाईलवरुन ई पिकपाहणी पुर्ण करावी असे आवाहन निफाड चे तहसीलदार शरद घोरपडे यांनी केले आहे

यापुर्वी शेतकरी खातेदार यांची पिक पाहणी तलाठी यांचेमार्फत होत होती.त्यासाठी शेतकऱ्यांना पिककर्ज, पिकविमा,आपत्तीचे नुकसान,बँक कर्जासाठी पिकपेरा लावणेकामी येणारी अडचण शासनाच्या ई पिक पाहणीच्या मोहिमेतून सोडविण्यात आलेली आहे.
शेतकऱ्याने ई पिक पाहणी व्हर्जन २ हे अॅप स्वतःच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोअर मधुन अॅप डाऊनलोड करुन इंस्टॉल करावयाची आहे. त्यामध्ये स्वतःचे शेतात जावुन अचुक गट नंबर नोंदवुन त्यामध्ये मुख्य पिकाचे छायाचित्र शेताच्या जास्तीत जास्त आतमध्ये जावुन फोटो काढायचा असल्याने रब्बी ई पीकपाहणी अचुक नोंदविण्यात येईल याची काळजी घ्यावयाची आहे. त्यासाठी काही अडचण उद्भवल्यास संबंधित शेतकरी यांनी त्यांचे गावातील तलाठी यांचेशी संपर्क साधावा.सदर रब्बी ई पिकपाहणी दि. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत शेतकऱ्यांनी नोंदवावयाची आहे. तरी महसुल प्रशासनाच्या वतीने निफाड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी दि. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत आपल्या अॅन्ड्रॉईड स्मार्ट मोबाईलवरुन ई पिकपाहणी पुर्ण करावी असे आवाहन तहसीलदार शरद घोरपडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *