सिडको : दिलीपराज सोनार
जय भवानी रोड येथील साबरमती सोसायटीत आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली. अमोल मेश्राम या व्यक्तीचा खून करण्यात आला असून, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उपनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरु आहे.
नाशिक शहरात खुनाचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. मागील काही महिन्यांपासून शहरात खून, हल्ला आणि गुन्हेगारी प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिक हादरले असून, पोलीस प्रशासनापुढे गुन्हेगारी नियंत्रणाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.