मागील आठवड्यात आमच्या मैत्रिणींचा भिशीचा ग्रुप जमला होता, त्यानंतर या आठवड्यात माझ्या वाढदिवसाला आम्ही सगळया बहिणी एकत्र जमणार होतो, जमलोही! त्याआधी शाळेत एकदा 15 ऑगस्टला सगळ्या मैत्रिणी मिळून बाहेर फिरायला जाणार होतो.. या तिन्ही घटनांचा विषय एकच होता काहीतरी ठरवायचं होते…. ठरलही…पण अचानक काहीतरी कारणाने ते रखडलं!
या पणमध्ये बर्याच गोष्टी लपल्या आहेत, कोणी म्हणे घरी विचारावं लागेल, कोणी म्हणे दोन दिवसांसाठी एवढा खर्च? अशक्य… तर एकजण तर म्हणे नवर्याकडे पगार द्यावा लागतो! हिशोब द्यावा लागतो.. तो देईल तेवढे पैसे आठवड्यात वापरायचे बापरे….असंख्य. पण!
मग मनात शंका आली, खरच स्त्री स्वतंत्र आहे का? व तिला आर्थिक स्वातंत्र्य तरी आहे का? की…ती स्वतःच ते घेण्यास असमर्थ्य आहे, तिचा सन्मान ती मिळवतेय, पण आर्थिक स्वातंत्र्य नाही मिळवू शकत. कितेक घरात अजूनही आजही एक-एक लाख रुपये मिळवणार्या बायका अखंड स्वतःच घरची कामं करत असतात, त्यात त्यांना आनंदही मिळत असेल, पहाटे पाचपासून…. स्वयंपाकाचा डबा, ते रात्रीच जेवण, खरकटी काढणं, मुलांचं सगळं बघणं, शिक्षण, फी, ट्युशन, त्यांचे छंद, येणारे जाणारे हे सगळं त्या मॅनेज करत असतात!
पैसा म्हणजे स्वतः मिळवलेला किंवा पगाराचा जरी आकडा तरी पण स्त्रीचं स्वातंत्र्य म्हणजे नुसतं हे नव्हे; तो तुम्ही कसा वापरता, किती वापरता, किती शिल्लक ठेवतात, किती
स्वतःसाठी खर्च करतात, दुसर्यांवर किती अवलंबून आहात, मुलं तुमच्या पैशांवर अवलंबून आहेत का? किंवा ते गैरवापर करत आहेत का? घरात खर्च करण्यासाठी तुमची मत आहेत का आणि त्यावर तुम्ही स्वावलंबी आहेत का? ठाम आहात का? यावर ते अवलंबून असतं त्याबाबतीत स्त्रियांमध्ये तरी स्पष्टता आणि आत्मविश्वास हवा….
प्रत्येक घरात स्त्री कमावतीच असेल असे नाही! गृहिणीसुद्धा एक प्रकारे पैशाची बचत करून पैसा शिल्लक ठेवतेच की! ते काटकसरीच तंत्र तिला उपजत अवगत असते! स्वतःच्या शारीरिक सुरक्षेसाठी तिला पूर्ण स्वावलंबी व्हावं लागतं…
परत तिला आजारपणं, स्वतःचं दुखणं, मुलांचं शिक्षण, स्वतःचे छंद, फिरणं, पै-पाहुणे, लग्न, हळदी-कुंकू, सण-समारंभ, कूळ धर्म, वाढदिवस, स्वतःसाठी स गळीच आर्थीकक बाजू बघावी लागते. मग तिने आर्थिक स्वातंत्र्य स्वतःकडे ठेवलं तर काय बिघडतं? प्रत्येक वेळी नवर्यावर किंवा घरच्यांवर का अवलंबून राहावे? कधी दुर्घटना झाली, आजारपण आलं तर स्त्रीच आणि पूर्ण कुटुंबाचं स्वप्न आयुष्य बदलून टाकते…मग त्या स्त्रीने स्वतः निर्णय घेऊन आर्थिक बाजू आपल्याकडे ठेवली तर काय हरकत आहे?
पण आपल्याकडे पुरुषांचं वर्चस्व जास्त असतं… पुरुषप्रधान संस्कृती मूळे कदाचित असेल, !स्त्रियांचा आरोग्य विमा, गुंतवणूक, बँकेत, पोस्टात खाते, तिच्या नावाने काही रक्कम, लाडकी बहीण योजना किंवा बिझनेसमधून काही ठराविक उत्पन्न तिला असलं पाहिजे तरच ती ताठमानेने जगू शकते! मला खूप जणी सुचवतात तू तुझा लेखनाचा छंद जोपासते, तुला किती पैसे मिळतात? किंवा तू पुस्तक प्रकाशित केले त्यात तुला किती उत्पन्न मिळालं? खरंतर ते मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे, पण मला हवं आहे हेही तितकच खरं आहे….! आर्थिक स्वातंत्र्यच तिला एक स्थैर्य, विश्वास, सुख देते… स्वाभिमान देते… खूप महिलांनी कोरोनात हॉटेल काढून, डबे करून, शिवणकाम करून, गाण्याचे क्लास काढून, आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे व त्या संधी त्यांनी स्वतः शोधलेल्या आहेत… संधीचा उपयोग करून घेतला आहे. त्या संधीचा सोनं करायची ताकद त्यांच्यात आहे… आणि ती असायलाच हवी! प्रत्येक स्त्री आयुष्यभर दुसर्यासाठी झटते! पत्नी, आई, बहीण, सासू, काकू, वहिनी, मुलगी, सून… पण तरीपण एक ती स्वतंत्र स्वावलंबी स्त्री आहे आणि ते होण्यासाठी तिला खरंच खडतर प्रवास करावा लागतो! त्यात तिचा स्वाभिमान, आनंद असतो! स्वावलंबन असतं, मग का बर स्त्रियांनी स्वतःच स्वतःसाठी स्त्रीचं आर्थिक स्वातंत्र्य जपायला नको का?
Economic freedom of women
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…