कोल्हापूर:
राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.कागलमधील त्यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. मुश्रीफ यांच्या घरी चौकशी करण्यात येत आहे. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांआधी किरीट सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून कारवाईचा इशारा दिला होता त्यानंतर आता ही मोठी कारवाई होत आहे.