मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर 

 

नाशिक : प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शुक्रवारी (दि.21) नाशिक दौऱ्यावर येत असून यावेळी त्याच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतर गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर नाशिकमध्ये पक्षाचा पहिलं कार्यालय सुरू होणार आहे. यातून नाशिक शहरात शिंदे गटाला आणखी बुस्ट मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री सकाळी दहा वजतां ओझंर विमानतळावर दाखल होणार आहे. सकाळी साडे दहा वाजता नाशिकरोड येथे सारथी कार्यालयाकचे उदघाटन होईल. पुढे पळसे येथे नासा का च्या गाळप हंगामा चा शुभारंभ आणि त्यानंतर पक्ष कार्यालयाचे उदघाट्न केले जाणार आहे. दरम्यान

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं आणि शिंदे गटाचं हे पहिलं संपर्क कार्यालय आहे, ज्याची बांधणी नाशिक मध्ये झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या हस्ते या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. प्रवेशद्वारावरच बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यात आलेली आहे. बरोबर वाघाचं इथे चिन्ह देखील आहेत. एकूणच या कार्यालयाचा जर आपण आढावा घेतला तर एक कॉर्पोरेट लूक या ऑफिसला देण्यात आलेला आहेत. इथेच बाजूला नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे देखील कार्यालय आहे आणि याच कार्यालयाला लागून हे ऑफिस सुरू करण्यात आलेले आहे. दरम्यान शिंदे गटाच्या नाशिक कार्यालयात संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख त्याचबरोबर महानगर प्रमुख यांचे कार्यालय आहेत. इथूनच ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कारभार हा चालणार आहे. कार्यालयाच्या एका बाजूला कार्यालयीन स्टाफसाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. याच ठिकाणाहून सर्व सोशल मीडियाची काम हँडल केली जातील आणि ती सोशल मीडियामध्ये प्रसार माध्यमांमध्ये वितरित केल्या जातील, असे दिसते आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे बघणे तेवढेच महत्त्वाचा असून भविष्यामध्ये नाशिक शहरांमध्ये, जिल्ह्यामध्ये आपली फळी निर्माण करण्याचं एक मोठं आव्हान या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *