निवडणुकीचे बिगुल वाजले, महाराष्ट्रात या तारखेला मतदान
मुंबई: महाराष्ट्र
विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या असून, आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या, झारखंड,महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यामुळे तारखा कधी जाहीर होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. निवडणूक जाहीर झाल्याने आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून,20 नोव्हेंबर ला मतदान तर 23 ला मतमोजणी होणार आहे, 29 ऑक्टोंबर अर्ज भरण्याची अखेरची मुदत तर 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे,
गुन्ह्यांची माहिती उमेदवारांना तीन वेळा जाहिरात द्यावी लागेल,
मतदान केंद्रावर रांगेत बसण्यासाठी बाके ठेवणार
दोन किलोमीटर च्या आत मतदान केंद्र