नाशिक : प्रतिनिधी
निमाचा या संस्थेचा कारभार नुकताच धर्मादाय सहआयुक्तानी नवीन विश्वस्त मंडळाकडे सुपूर्त केला, त्यानुसार निमाच्या पुढील कायदेशीर बाबींची तरतुदी करण्याबरोबरच नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक कण्याच्या दृष्टीने आज निमा कार्यालयात नवीन विश्वताच्या बैठकीत सर्वानुमते धनंजय बेळे यांची निमाच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
निमाचा कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी बुधवार दिनांक ११ जानेवारी रोजी नवीन विश्वस्थांची बैठक बोलविण्यात आली होती त्यानुसार पुढील कायदेशीर तरतुदीची सविस्तर माहिती होण्यासाठी ज्येष्ठ वकील सिकंदर सैयद यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात आले. निमाचा पुढील सर्व कारभार हा १९८३ रोजी मंजूर करण्यात आलेल्या घटनेनुसार होणार असल्याने नवीन ६ पदाधिऱ्यांची निवड लवकरच करण्यात येणार आहे यात अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, खजिनदार, मानद सरचिटणीस, सह सचिव अशी पदाधिकाऱ्यांची संख्या असणार आहे.
आज झालेल्या बैठकीत निमाच्या पुढील कारभार सुरळीत चालण्यासाठी सर्वानुमते प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही सर्वानी दिली.
यावेळी निमास ज्येष्ठ उदयोजक स्वामी समर्थ इलेक्ट्रॉनिक्स चे सौमित्र कुलकर्णी यांनी ५१००० रु. देणगी दिली.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष धनंजय बेळे यांनी निमाचा कारभारात सुसूत्रता व पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी तसेच सर्व सभादांना विश्वासात घेऊन कामकाज करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…
View Comments
🙏🏻 Abhinanadan🙏🏻
Dhananjay Sir ek yashasvi pichari aahet, NIMA is proud of you.
Unispec Foods Pvt Ltd
Talegaon
Dindori