नाशिक

स्थायी समिती सभापतिपदाची आज निवड

मच्छिंद्र सानप यांची निवड निश्चित

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेची अर्थवाहिनी असलेल्या स्थायी समिती सभापतिपदासाठी आज, बुधवारी (दि.25) निवडप्रक्रिया होणार आहे. भाजपने मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडे स्थायी समितीत स्पष्ट बहुमत असल्याने बुधवारच्या निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव स्थायी सदस्य असून, त्या मुकेश शहाणे यांनीही अर्ज भरला आहे. ते माघार घेण्याची शक्यता आहे.
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद राहणार आहेत. स्थायी समितीत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने सभापती भाजपचाच होणार आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी कोणाला संधी द्यायची यावरून भाजपमध्ये काही दिवसांपासून मच्छिंद्र सानप, माधुरी बोलकर, दीपाली कुलकर्णी यांची नावे चर्चेत होती. अखेर सानप यांच्या नावावर सोमवारी (दि. 23) शिक्कामोर्तब करण्यात आले. तब्बल पावणेचार वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या 6 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. नंतर स्थायी समिती सदस्य नियुक्तीनंतर सभापती पदाचे वेध लागले होते. आज, बुधवारी स्थायी समिती सभापतींची निवड केली जाणार आहे.
भाजपने आपल्यासह शिंदेसेनेच्या स्थायी सदस्यांना सहलीला नेले आहे. बुधवारी सकाळी स्थायी सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या सोमवारी (दि.16) महापौर हिमगौरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष महासभेत स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड करण्यात आली. महापालिका निवडणूक निकालानंतर पक्षांच्या गटनोंदणीनंतर विविध पक्षांचे तौलनिक संख्याबळ निश्चित झाले होते. त्यानंतर विविध पक्षांच्या गटनेत्यांकडून स्थायी समिती सदस्य नियुक्तीसाठी बंद लखोट्यात नावे महापौरांकडे सादर करण्यात आली होती. गटनेत्यांकडून प्राप्त पत्रांचे वाचन नगरसचिवांकडून महासभेत करण्यात आले. त्यानंतर महापौर आहेर-आडके यांनी स्थायी समितीच्या 16 सदस्यांची नावे घोषित केली. त्यात भाजपचे नऊ, शिवसेना शिंदे गटाचे चार, शिवसेना उबाठाचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य निवडला होता. नंतर नगरसचिव विभागाने आयुक्तांमार्फत सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी आज, बुधवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता सभापती निवडीसाठी विशेष महासभा बोलावली आहे.

Election of Standing Committee Chairman today

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

8 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

8 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

8 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

8 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

8 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

9 hours ago