स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुन्हा लांबणीवर
नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कधी होणार? याचे उत्तर सद्या तरी मिळणे अवघड झाले आहे. आज या संदर्भात सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता ही सुनावणी28 मार्चला होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे, ओबीसी आरक्षण मुळे निवडणुका लांबणीवर पडत आहे, आधी कोरोना आणि नंतर ओबीसी आरक्षण यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, पावसाळ्यात निवडणुका घेतल्या जात नाहीत, त्यामुळे पावसाळा संपल्यावर निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे, तब्बल 1 वर्षांपासून राज्यातील महापालिका, जिल्हापरिषद आणि काही पालिकेवर प्रशासक आहेत,