घरी जाऊन शरद पवार यांची पूर्ण केली अर्जप्रक्रिया
मुंबई :
राज्यसभेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून एकूण सहा अर्ज, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाने एक अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे सात जागांसाठी सातच उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत. तब्येतीच्या कारणामुळे त्यांना हजर राहता आलं नाही. त्यामुळे निवडणूक अधिकार्यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केली. आजारी व्यक्ती राज्यसभेचा अर्ज दाखल करण्यासाठी येऊ शकला नाही, अशी पहिलीच घटना घडली.
राज्यसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. दोन उमेदवार देण्याची चर्चा असलेल्या शिवसेनेने अखेर एकच उमेदवार दिला. ज्योती वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, रोहित टिळक यांचा अर्ज भरला गेला नाही. त्यामुळे सात जागांसाठी सातच उमेदवार राहिले. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून चार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक आणि शिवसेनेकडून एक असे महायुतीचे सहा अर्ज दाखल झाले आहेत. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीवरून शिवसेना पक्षात नाराजी असल्याचीही चर्चा आहे. संजय शिरसाट म्हणाले, आता सस्पेन्स संपला आहे. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यातील राज्यसभेच्या सात जागांपैकी महायुतीच्या वाट्याला सहा जागा आल्या होत्या. यात भाजपला चार तर शिंदेसेना-राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. तर महाविकास आघाडीला एका जागा मिळाली होती. यानंतर भाजपकडून राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना संधी देण्यात आली. तर राष्ट्रवादीकडून दिवंगत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि शिंदे सेनेकडून प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर झाली. तसेच महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसने शरद पवारांना पाठिंबा दिला. दरम्यान, त्यानंतर आज (गुरुवारी) विधानभवनात भाजपच्या उमेदवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि पार्थ पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ हजेरीत अर्ज भरला. तसेच शिंदे सेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत भरला. तर शरद पवारांचा उमेदवारी अर्ज खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार, जयंत पाटील यांच्यासह मविआ नेत्यांच्या हजेरीत दाखल केला.
शिंदेंनी दुसरा उमेदवार दिला नाही
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडे अतिरिक्त 20 मते तर राष्ट्रवादीकडे अतिरिक्त तीन मते आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दुसरा उमेदवार देणार आणि शरद पवारांपुढे आव्हान निर्माण करणार असं चित्र होतं. त्यासाठी रोहित टिळक यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र, अखेरच्या क्षणी शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा उमेदवार दिला नाही आणि राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली.
जनतेचा विश्वास हेच सर्वांत मोठे बळ : शरद पवार
महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी असल्याचे शरद पवार म्हणाले. 1967 पासून माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे. हा प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून, महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, कारण त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणे मला शक्य झाले. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी आयुष्यभर मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ही सेवा प्रामाणिकपणे करत राहण्याचा माझा प्रयत्न असेल. दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलेल्या सर्व नेत्यांनी त्यांच्या अर्जाला पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Elections for 7 Rajya Sabha seats finally go unopposed
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…