पालिका प्रवेशद्वारावरच छेडले आमरण उपोषण
नाशिक : प्रतिनिधी
महानगरपालिकेने शहर स्वच्छतेचे कंत्राट दिलेल्या वॉटरग्रेस प्रोडक्ट्स कंपनीने ऑक्टोंबर महिन्यात 450 ते 500 सफाई कामगारांना कामावरुन काढण्यात आले होते. याविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व सफाइ कामगारांच्या कुटुंबीयांनी सोमवार (दि.20) महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच आमरण उपोषण पुकारले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे, सफाइ कर्मचारी विरोद्ध वॉटरग्रेस व्यवस्थापन यांच्याविरोधात संघर्ष सुरु आहे. कामावरुन काढलेल्या कामगारांना संबंधित ठेकेदार घेत नसल्याने आता थेट उपोषणाचे हत्यार उपासण्यात आले आहे. मनसेने याप्रश्नी म्हटले की, कामगारांच्या प्रश्नी वारंवार विविध मार्गांनी गोरगरीब कामगारांच्या समस्या मुख्यमंत्री, पालकमंत्री आदींसह मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन,. न्यायालय आदि विविध स्तरांवर मांडले. मात्र अद्यापही ह्या कामगारांना न्याय मिळाला नसून नाईलाजाने शेवटचा पर्याय म्हणून महात्मा गांधीच्या सत्याग्रहाच्या आमरण उपोषणाच्या हत्याराचा उपयोग केला आहे. सोमवारी सकाळी नउ वाजेपासून मनसेचेे पदाधिकारी, सर्व सफाई कामगार, त्यांच्या नातेवाईकांसह नाशिक महानगरपालिकेच्या दारावर आमरण उपोषणासफ बसले आहेत. उपोषणाला बसण्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालकमंत्री दादा भुसे. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांना माहिती देऊनही या बाबत शासन प्रशासनाला जाग आलेली नाही. प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष परशुराम साळवे, शहराध्यक्ष दलीप दातीर, माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख, महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे, विभाग अध्यक्ष योगेश लभडे, नितीन माळी व धिरज भोसले, शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे, ज्ञानेश्वर बगडे, शहर संघटक हरीश गुप्ता, जनहित कक्ष जिल्हा संघटक प्रफुल बनभेरू, कामगार सेना चिटणीस तुषार (बंटी) जगताप, महिला सेना शहराध्यक्षा अक्षरा घोडके, ॲड. महेंद्र डहाळे, विशाल भावले, पंकज दातीर, नितीन धानापुणे, शशी चौधरी यांच्यासह वॉटरग्रेसचे समाधान चव्हाण, गणेश दातीर, किशोर जाधव यांच्यासह 250 कामगार त्यांच्या कुटुंबियांसह ङ्गवॉटरग्रेसफ च्या ठेकेदारांच्या अन्यायीकृती विरोधात आमरण उपोषणास बसले आहेत.
.
आता माघार नाही
वॉटरग्रेस कंपनीने बेकायदेशीर कामगारांना कामावरुन काढून टाकले. आम्हाला कुठेच न्याय मिळाला नाही. त्यामुळे आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत. जोपर्यत आम्हाला न्याय मिळ्णार नाही. तोपर्यत उपोषणातून माघार नाही. आम्ही आता कोणत्याही परिणामांचा विचार करणात नाही.
दिलीप दातीर, शहराध्यक्ष, मनसे
……..
त्या दहा दिवसात वॉटरग्रेसला 38 लाखाचा दंड
दरम्यान ज्यावेळी कामगारांना कंपनीने कामावरुन काढून टाकले. तेव्हा शहरातील स्वच्छत्तेचा प्रश्न उदभवला होता. त्यावेळी पालिका प्रशासनाने 15 ते 26 ऑक्टोंबर दरम्यान वॉटरग्रेस कंपनीला तब्बल 38 लाखांचा दंड ठोठावला होता.
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…
नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला जखमी नांदगाव: प्रतिनिधी -…
मनमाड: प्रतिनिधी मागील काही दिवसांपूर्वी मनमाड शहरातील सिकंदर नगर भागातील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा…
राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…
जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर उपचार सुरू मोखाडा: …