नाशिक

कर्मचार्‍यांनी आरोग्याप्रती जागरूक राहावे : राधाकृष्ण गमे

जि.प. क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे बक्षीस वितरण उत्साहात

नाशिक : प्रत्येक कर्मचार्‍याने आपल्या आरोग्याप्रति जागरूक रहावे, प्रत्येक कर्मचार्‍यावर त्याचे कुटुंब अवलंबून आहे, त्यामुळे दिवसभराचा कार्यालयातील ताण तणाव हा कार्यालयातच विसरून कुटुंबासाठी वेळ द्यावा, नाशिक जिल्हा परिषदेने अतिशय कमी कालावधीत स्पर्धांचे आयोजन केले
आणि त्या यशस्वीरीत्या पार पाडल्याचे काम  मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व प्रशासनाने केले त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.
जिल्हा परिषद मुख्यालय आणि पंचायत समिती यांमधील सर्व कर्मचारी अधिकार्‍यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांतील सर्व विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी विजेत्या स्पर्धकांसमवेत जे स्पर्धक उपविजेते ठरले त्याचं देखील अभिनंदन करत पुढील वर्षी अजून जोमाने सराव करून स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा, असे सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ, दीपक चाटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ विष्णुपंत गर्जे, कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्यासह सर्व गट विकास अधिकारी उपस्थित होते.
सांघिक खेळ (पुरुष) विजेते –
कबड्डी – पंचायत समिती नाशिक
खो-खो – पंचायत समिती सुरगाणा
क्रिकेट – पंचायत सामिती सिन्नर
व्हॉलीबॉल (पासिंग) – पंचायत समिती देवळा
रिले (4ु100) – पंचायत समिती  दिंडोरी (प्रथम)
पंचायत समिती  बागलाण (द्वितीय)
रिले (4ु400) – पंचायत समिती बागलाण (प्रथम)
पंचायत समिती  त्र्यंबकेश्वर (द्वितीय)
सांघिक खेळ (महिला) विजेते –
कबड्डी – जिल्हा परिषद मुख्यालय
खो-खो – पंचायत समिती  त्र्यंबकेश्वर
क्रिकेट – जिल्हा परिषद मुख्यालय
रिले (4ु100) – पंचायत समिती  त्र्यंबकेश्वर (प्रथम)
पंचायत समिती  दिंडोरी (द्वितीय)
रिले (4ु400) – पंचायत समिती त्र्यंबकेश्वर (प्रथम)
पंचायत समिती  निफाड (द्वितीय)

सांस्कृतिक स्पर्धा विजेते –
एकांकिका – मुलगी झाली हो – पंचायत समिती निफाड (प्रथम)
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले – पंचायत समिती निफाड (द्वितीय)
नृत्य सामूहिक – पंचायत समिती येवला संस्कृती नृत्य (प्रथम)
पंचायत समिती नाशिक तांडव नृत्य (द्वितीय), पंचायत समिती चांदवड थीम नृत्य (तृतीय)

Ashvini Pande

Recent Posts

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

6 hours ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

1 day ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

1 day ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

2 days ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

2 days ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

2 days ago