नितीनकुमार मुंडावरे(उपजिल्हाधिकारी मनरेगा)
देवयानी सोनार
नाशिक जिल्हा हा शेतीच्या बाबतीत अत्यंत क्रांतिकारी जिल्हा आहे.अनेक अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत.त्यांना उभे राहण्यासाठी मनरेगासारखी योजना चांगली आहे.त्यात व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना आल्या आहेत. शेतकर्याला त्याच्याच शेतात काम करण्यासाठी शासन पैसे देते. परंतु त्याला मजुरी देणे हा उद्देश नसून त्याचे सक्षमीकरण करणे हे मनरेगाचे उद्दिष्ट आहे, असे उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दै.गांवकरीशी बोलतांना सांगितले.
संपूर्ण नाव : नितीनकुमार भिकाजी मुंडावरे
गाव ? सटाणा
शिक्षण आणि पदापर्यंत कसे पोहचले.
पदवीपर्यंत सटाणा महाविद्यालयात,ग्रॅज्युएशन बीएस्सी ङ्गिजिक्समध्ये आणि एमएस्सी न करता स्पर्धा परीक्षांची तयारी केली .स्पर्धापरीक्षांमधून निवड झाली. 2005 ला नाशिक येथे झालेल्या जमीन घोटाळ्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्यशासनाने माझी चौकशी अधिकारी म्हणून संजय गांधी योजना तहसिलदार या पदावर नियुक्ती केली. त्यावेळी साधारण 450 केसेसचा निपटारा वर्षभरात केला.
चौकशी अधिकारी कामकाज संपल्यानंतर चिटणीस नाशिक येथे सव्वा वर्ष कामकाज केले.2008ला उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली. भूसंपादन अधिकारी जळगाव ,उपविभागीय अधिकारी(प्रांताधिकारी)उल्हा
दिनचर्या कशी असते.?
पहाटे लवकर उठणे, चालण्याचा आणि ग्रीन जीममध्ये व्यायाम,वृत्तपत्र वाचन,तसेच सायंकाळी चालणे,वाचन.
सुटीच्या दिवशीचे नियोजन ?
कुटुंबीयांना वेळ देता येतो,त्यांना घेऊन शहराच्या आसपास ङ्गिरणे होते.त्याशिवाय मित्रपरीवार क्रिकेट खेळणे किंवा ट्रेकिंगला जात असतो.
स्वतःला पॉझिटिव्ह ङ्गिट ठेवण्यासाठी काय करतात.?
शारीरीक व्यायाम ट्रेकिंगमुळे आंनद मिळतो त्याशिवाय स्वतःला पॉझिटिव्ह ठेवतो.
कुटुंबातील सदस्य ?
पत्नी,दोन मुले,आई आहेत.मुलगी एमबीए करीत आहे आणि मुलगा सिव्हिल डिप्लेामा करीत आहे.
ताणतणावाचे नियोजन?
नोकरी नवीन असल्याने ताणतणावाचा परिणाम व्हायचा परंतु कालांतरणाने चूक लक्षात आल्याने घर आणि कार्यालयातील कामाचे ताणाचे संतुलन ठेवले जाईल हे कटाक्षाने पाळतो.गाणी एकूण तणाव दूर करण्याचा प्रयत्न करतो.
आवडता रंग: आकाशी
फिरण्याचे आवडते ठिकाण : मनाली
कपडे कसे आवडतात : साधे कपडे आवडतात.शुज एवजी चप्पल जास्त आवडते.ब्रन्डेड वापरण्याकडे ओढा नाही.
कोरोना काळातील अनुभव :
सकारात्मक भूमिका ठेवली.माणसाची गरज फार थोडी आहे.एखाद्या गोष्टीच्या मागे न पळता आनंदाने राहू शकेल ही शिकवण कोरोनात मिळाली.
मनरेगाबद्दल काय सांगाल:
शेतरकर्याला राहण्यासाठी जे घरकुल देतो त्यात मनरेगाचा हिस्सा आहे.त्याचबरोबर गोठे उभारू शकतो. खतासाठी, विहिर,शेततळे घेता येते.ङ्गळबाग,ङ्गुलशेती अशा मनरेगाच्या विविध योजना आहेत.या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवून त्यांना सक्षम करणे यासाठी प्रयत्न सुरू आहे.