दुकाने, पत्र्याच्या शेड हटवल्या
नाशिक/ वडाळागाव : प्रतिनिधी
मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी द्वारका चौकातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर काल महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सकाळपासूनच द्वारका भागातील अतिक्रमणांवर बुलडोझर चालविला. त्यामुळे द्वारकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
द्वारका भागात होणार्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून याठिकाणी असलेले सर्कल हटवून आता सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. याठिकाणी शनिवारी भुजबळ यांनी पाहणी करुन महापालिकेच्या अधिकार्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर काल सकाळीच मनपाने या भागात असलेले अतिक्रमित दुकाने हटविली.
द्वारका परिसरात वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी हाजी अली सर्कलच्या धर्तीवर आधुनिक सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. द्वारका चौक ते वडाळा नाका परिसरात रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेली दुकाने, पत्र्याच्या शेड, अनधिकृत रचनेचे अडथळे हटवण्यात आले. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्या अतिक्रमणांवर आळा बसणार असून, सिग्नल यंत्रणेसाठी आवश्यक जागाही मोकळी झाली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे, पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, पूर्व व सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव, तसेच नाशिक रोड व पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे आदी अधिकार्यांनी सहभाग घेतला. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व यंत्रणा सकाळपासून सक्रिय होती.
या कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी संपूर्ण परिसरात लक्ष ठेवत शांततेत कारवाई पार पाडली. सिग्नल यंत्रणा बसल्यानंतर द्वारका परिसरातील वाहतूक नियंत्रणात राहील, अपघातांचे प्रमाण
कमी होईल.
अशी होती यंत्रणा
सहा अतिक्रमण गाड्या, दोन जेसीबी, तीन ट्रॅक्टर, एक डंपर, महापालिकेचे सर्व पथक, तसेच पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
88 आस्थापनांवर बडगा
द्वारका ते मुंबई नाका परिसरातील मुख्य रस्त्याला व सर्व्हिस रोडवरील अडथळा निर्माण ठरणार्या 88 अतिक्रमित आस्थापनांवर पोलिस विभाग व नाशिक महानगरपालिकेच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. सहा विभागांच्या सर्व कर्मचा़र्यांंनी दोन जेसीबी, चार ट्रकद्वारे अतिक्रमण मोहीम राबवली. ही मोहीम सकाळी दहापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत राबवली.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…