पंचवटी : प्रतिनिधी
अनंत चतुर्दशी अन् ईद-ए- मिलादच्या पार्श्वभूमीवर वाकडी बारव मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण मनपाच्या पश्चिम विभागाच्या वतीने हटविण्यात आले.
शुक्रवारी( दि.5) ईद – ए- मिलाद असून, शनिवारी (दि. 6) अनंत चतुर्दशी आहे. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, मनपा पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे व राजाराम जाधव आदींनी वाकडी बारव ते दूधबाजार ते भद्रकाली ते मेन रोड ते एम.जी. रोड आदी भागात पाहणी करून रस्त्यालगत असलेल्या व्यापार्यांशी चर्चा करून अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने वाकडी बारव, दूधबाजार, भद्रकाली, मेनरोड, एम.जी. रोड, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा ते मालेगाव स्टॅण्डपर्यंत मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्यात आले.
यादरम्यान टपर्या, हातगाडे, स्टॅण्ड बोर्ड, लोखंडी टेबल, प्लास्टिक खुर्च्या, प्लास्टिक स्टूल, मोठ्या छत्र्या, प्लास्टिक टेबल, प्लास्टिक कॅरेट, लोखंडी स्टूल, लोखंडी जाळ्या, प्लास्टिक पाल इत्यादी साहित्य जप्त करून ते आडगाव गोडावून येथे जमा करण्यात आले. या अतिक्रमण मोहिमेत पश्चिम विभागप्रमुख प्रवीण बागूल, जावेद शेख, जगन्नाथ हमारे, संजय सूर्यवंशी, संतोष पवार, मोहन भांगरे, बापू लांडगे, सुनील कदम तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…