सातपूरला अतिक्रमणे हटवली

सातपूर : प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका सातपूर विभागीय कार्यालय हद्दीतील राष्ट्रीय मुक्त फेरीवाला (हॉकर्स )झोन क्र 3 मध्ये आज सकाळी मनपाच्या वतीने वाढीव अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली. लॉकडाऊननंतर सातपूर एमआयडीसीच्या जागेत फेरी विक्रेत्यांसाठी मनपाच्या वतीने होकर्स झोन तयार करण्यात आला.व्हिक्टर गॅसकेट कंपनी भिंतीलगत असलेल्या फेरीवाला  झोनमध्ये नियमानुसार 20 व्यवसायिकांसाठी पाच बाय पाच ची जागा आहे.परंतु काही दिवसांपासून येथे अनेक वाढीव अतिक्रमण झालेले दिसून येत होते. या अनुषंगानेच आज सातपूर मनपाच्या विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या उपस्थितीत वाढीव केलेल्या अतिक्रमणावर जेसीबी फिरवण्यात आला. ही कारवाई नाशिक मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील तसेच सातपूर विभागीय अधिकारी सुनिता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली संजय चौधरी, राजेंद्र भोरकडे, मधुकर गायकवाड, भरत खैरनार, तानाजी निगळ, संजय कोठुळे, भगवान सूर्यवंशी, जीवन ठाकरे, विलास काळे, शुभम काळे तसेच पाच अतिक्रमण वाहने, एक जेसीबी, पंचावन मनपा कर्मचारी आणि दहा पोलीस यांच्या मोहिमेत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *