त्र्यंबकेश्वर:
ञ्यंबक नगर परिषद प्रशासनाने यावर्षी यात्रोत्सवात अभिनव उपक्रम राबविला आहे.यामध्ये पर्यावरण संवर्धन. पर्यावरण-रक्षण,प्लास्टीक बंदी, पाण्याचा मर्यादीत वापर, कच-याचे नियोजनपुर्वक व्यवस्थापन या तत्वावर त्र्यंबकेश्वर शहरातील आलेल्या एकूण ५०० दिंडयाचे मुल्यांकन या तीन दिवसांमध्ये करण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट पाच दिंडीची पारितोषिकासाठी निवड करण्यात आली.सदर पारितोषीक विजेत्यांना सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्रक व दिंडी उपयोगी साहित्य साहित्य वितरीत करण्यात आले. गुरुवारी पुरस्कार वितरण सोहळा प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळा करिता निर्मलवारी अभियानाचे अध्यक्ष भरत केळकर, यात्रा नियोजन दक्षता समिती अध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, यात्रा नियोजन दक्षता समिती उपाध्यक्षा श्रीम. त्रिवेणी तुंगार, समिती सदस्य कैलास चोथे, समाजसेवक दिलीप पवार, निर्मलवारी प्रतिनिधी सुनिल लोहगांवकर, नगरपरिषद अधिकारी श्रीम पायल महाले, अभिजीत इनामदार, राहुल शिंदे, पंकज शिंपी, श्रीम अनिता गुंजाळ, नितीन शिंदे, संजय लगड,अमोल दोंदे उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त मानक-यांचे वतीने पाटोळे रामनगर आटकवडे, पायी दिंडी सोहळ्याचे आयोजक संपत कराड यांनी त्यांचे मनोगत मांडून त्रिंबक नगरपरिषद व निर्मल वारी अभियान सदस्यांचे आभार मानले.