सटाणा बाजार समितीत प्रस्थापित नेत्यांना धक्का

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

माजी सभापती संजय सोनवणे यांचा करिष्मा मातब्बरांना लोळवत नऊ जागांवर विजय..

सटाणा: प्रतिनिधी

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रस्थापितांना हादरा देत सोसायटी व ग्रामपंचायत गटात
श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलने 9 जागांवर विजय प्राप्त केला असून, प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनलला 6 जागांवर समाधान मानावे लागले. संचालक मंडळाच्या 18 पैकी उपरोक्त 15 जागा व इतर व्यापारी तसेच हमाल व तोलारी गटातील 3 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बागलाणचे सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी कामकाज केले.
विजयी उमेदवारांमध्ये गॅस सिलेंडर या निशाणीवर निवडणूक लढविणाऱ्या बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, भाजपचे माजी शहराध्यक्ष राहुल सोनवणे, गजेंद्र चव्हाण आदींच्या नेतृत्वाखालील श्री यशवंत पॅनलचे सहकारी संस्थांचा मतदारसंघ सर्वसाधारण गटात रवींद्र विठ्ठल सोनवणे, राहुल केदा सोनवणे, दिनेश अशोक गुंजाळ, मनोहर दयाराम बिरारी, महिला राखीव गटात सिंधुबाई संजय सोनवणे, इतर मागासवर्गीय गटात काळू दौलत जाधव, विमुक्त जाती व भटक्या जमाती गटात निंबा पुंजाराम वानले, ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गात गणेश वामन ठाकरे, आर्थिक दुर्बल घटक म्हणून दीपक मधुकर रौंदळ विजयी झाले आहेत. तसेच मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव, नानाजी दळवी, राघो अहिरे आदींच्या नेतृत्वाखालील रोडरोलर या निशाणीवर निवडणूक लढविणाऱ्या शेतकरी विकास पॅनलचे सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण गटात किशोर जगन्नाथ खैरनार, प्रमोद वसंतराव बिरारी, डॉ. राहुल वसंतराव सोनवणे, महिला राखीव गटात सुरेखा अरुण अहिरे, ग्रामपंचायतीच्या मतदारसंघ सर्वसाधारण गटात हरिभाऊ पांडुरंग जाधव, विनोद सीताराम अहिरे विजयी झाले आहेत.
व्यापारांचा मतदारसंघ अडते व व्यापारी गटात दीपक गोविंद सोनवणे, योगेश बाळासाहेब रौंदळ विजयी झाले आहेत. तसेच हमाल व तोलारी मतदार संघाच्या हमाल व तोलारी गटात संदीप दगा साळे विजयी झाले आहेत. शहरातील वाणी मंगल कार्यालयात मंगळवार दि. 1 रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी प्रारंभ झाला दुपारी दोन वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
दरम्यान केवळ दळवी व समाधान वाघ या उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला. परंतु एका मताने डॉ. राहुल सोनवणे यांचा विजय जाहीर करण्यात आला. बाद मतांमुळे केवळ दळवी यांना पराभव स्वीकारावा लागला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल मोरे बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे आदींनी कामकाजात सहभाग घेतला. पोलीस उपाधीक्षक नितीन गणापुरे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी बंदोबस्त ठेवला होता.

माजी जिल्हा परिषद सदस्या सिंधुताई ठरल्या जॉईट किलर


बागलान पंचायत समितीच्या उपसभापती, पठावे जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या, आणि डांगसौंदाणे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या सिंधुताई संजय सोनवणे यांची उमेदवारी यशवंत शेतकरी पॅनलला लाभदायक ठरली.
आजपर्यंत एकाही निवडणुकीमध्ये सिंधुताईंनी पराभव पाहिला नाही .
प्रचंड नातंगोत आणि पतीराज संजय पंडितराव सोनवणे यांचा
जनसंपर्क यशवंत शेतकरी पॅनलला लाभदायक ठरला..

 

Bhagwat Udavant

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

12 hours ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

12 hours ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

23 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

1 day ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

1 day ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

1 day ago