पालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये ‘आरआरआर’ केंद्र ाची स्थापना

 

 

‘टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर होणार

 

नाशिक : प्रतिनिधी

 

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालया ने “मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर” हे अभियान देशभरात राबविण ्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस ्थांना रिड्यूस रियुज आणि रिसायकल सेंटर (कमी करणे, पुन र्वापर आणि पुनर्वापरसाठी प्रक्रिया केंद्र आरआरआर) स्थ ापन करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

 

नाशिक महानगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत अभियान, स् वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा या मोहिमांच्य ा अंतर्गत मनपाच्या सहा विभागीय कार्यालयांमध्ये सहा रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटरची (आरआरआर) स्थापन करण्यात आलेली आहे. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथेही

 

नुकतीच ‘आरआरआर’ केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत नाशिक नागरिकांना आवाहन करण्यात येते, की आपल्याकडील निरुपयोगी वस्तू. कपडे, पादत्राणे, भांडी, पुस्तके, प्लास्टिकच्या वस ्तू, शोभेच्या वस्तू, स्टेशनरी आदी प्रकारच्या वस्त ू मनपाच्या ‘आरआरआर’ केंद्रात जमा कराव्यात. जेणेकरून कचऱ्याची निर्मिती कमी होईल, कचऱ्याचा प ुनर्वापर होईल किंवा कचऱ्यापासून  वस्तू तयार केल्या जातील. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे आपल्या शहराच्या सौ ंदर्यांत भर पडणार आहे. त्यामुळे आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत ह ोणार आहे, अशी माहिती महानगरपालिका घनकचरा व्यवस्थ ापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली नवीनआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *