उत्तर महाराष्ट्र

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच

खासदार अखिलेश यादव: मालेगावात समाजवादीची सभा

मनमाड : आमिन शेख

मी आलो आणि तुफान पाऊस सोबत आला आंधी तुफान आम्हाला थांबवायला आला होता का हाच काय कोणताही तुफान आता आम्हाला थांबवू शकत नाही आपण एवढ्या पावसात येथे आला आणि सभेला उपस्थित राहिला याबद्दल तुमचे स्वागत निवडणुकीची तारीख घोषणा झाली इतर पक्ष जागा वाटपावर चर्चा करते आहे मात्र समाज वादी पार्टी तुमच्या सोबत उपस्थित आहे भारतीय जनता पार्टी हताश झालेली आहे लोकसभेत त्यांची हार झाली त्यामुळे या निवडणुकीत सर्व पर्याय ते वापरत आहे हरियाणात भाजप हारत असतांना ते जिंकले असले तरी महाराष्ट्रात महायुती हारणार म्हणजे हरणार असे स्पष्ट मत समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा खासदार अखिलेश यादव यांनी व्यक्त केले मालेगाव आणि धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अखिलेश यादव यांनी मालेगाव येथील जाहिर सभेत आपले मत व्यक्त केले.
यावेळी अखिलेश यादव म्हणाले की इंडिया आघाडीने भाजपला विरोध केला आहे भाजपाने चारशे पारचा नारा दिला ते बहुमतात सुध्धा आले नाही अशाच पद्धतीने महायुतीच सरकार ही येणार नाही महायुती सरकार म्हणजे महादुखी सरकार आहे, महा भ्रष्टाचार सरकार आहे महाराष्ट्रातील सरकार महायुतीचे हारणार सरकार आहे त्यामुळे केंद्रातील सरकार देखील पडणार आहे महाराष्ट्र सरकार हे रोजगार देणारे सरकार होते सगळे बेरोजगार झाल समाजवादी पार्टी हे सगळ्यांचा विचार करणारे सरकार आहे मोबलिंचींग अन्याय विरूध्द आम्ही लढा देणार आहोत लोकसभेत बिल सादर केल्यावर आम्ही विरोध केला मुस्लिमांना त्रास देण्यासाठी बिल आणले जाते आहे जमीन खरेदी पार्टी म्हणून भाजपाची ओळख आहे असे यादव म्हणाले यावेळी विजांचा कडकडाट सुरू असताना यादव म्हणाले की आमच्या आवाजात ढगांचे आवजही सोबत आहे मालेगाव मधून समाज वादी पार्टी निवडणूक लढवणार आहे मालेगावचे लोक पावसाप्रमाने आम्हाला भरभरून मते देतील आणि भाजपला विरोध करतील बुलडोझर, एन्काऊंटर च्या विरोधात उत्तर प्रदेशची जनता आहे
खोटे नरेटीव्ह पसरवण्याचे काम भाजप करते आहे यांना धडा शिकवला पाहिजे यासाठी आपण इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवाराना मतदान करा असे आवाहन अखिलेश यादव यांनी केले.

 

शान ए हिंद यांना मालेगावातून उमेदवारी जाहीर


मालेगाव मध्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात समाजवादी पार्टी उतरणार आहे यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने समाजवादी पक्षातर्फे शान ए हिंद निहाल अहमद यांना उमेदवारी जाहिर करत असुन संपूर्ण मालेगाव मधील जनतेने त्यांना भरगोस मते देऊन निवडून आणावे असे आवाहन अखिलेश यादव यांनी केले तर याचवेळी त्यांनी रईस शेख यांना भिवंडीतून उमेदवारी जाहिर करत असल्याचे देखील सांगितले.

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

22 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

22 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

23 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

23 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

23 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

23 hours ago