दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत देखील मुलींनीच बाजी मारली आहे राज्याचा निकाल965.81 टक्के लागला.गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी १.९८ टक्के निकाल जास्त जाहीर झाला आहे. एकूण निकालात मुलींची टक्केवारी सर्वाधिक आहे.
९७.२१ टक्के मुली, ९४.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाले. निकालात यंदाही कोकण विभाग अव्वल असून, नाशिक चा निकाल95.28 टक्के लागला. नागपूर विभाग निकालात पिछाडीवर आहे.94.73 टक्के निकाल लागला आहे.