आर्थिक आरक्षणाचा मार्ग मोकळा

आर्थिक आरक्षणाचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली
केंद्र सरकारने लागू केलेले आर्थिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटना पिठाने वैद्य ठरवले,सरन्यायाधीश उदय लळीत आणि रवींद्र भट यांनी आरक्षणाच्या विरोधात निकाल दिला तथापि न्यायमूर्तींनी आरक्षणाच्या बाजूने निकाल दिल्याने आरक्षण लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. मावळते सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निकाल दिला आहे. . केंद्र सरकारने 103 वी घटनादुरुस्ती करून सवर्ण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षणची तरतूद केली होती. पाच न्यायमूर्तींपैकी तीन न्यायमूर्तींनी आर्थिक आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे देशभरात आर्थिक आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्या. रविंद्र भट यांनी आर्थिक आरक्षणाविरोधात निकाल दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *