माजी खासदार समीर भुजबळ यांचे नांदगावला जोरदार स्वागत! गणेश मंडळाना भेट देऊन केली महाआरती…!
नांदगाव: आमिन शेख
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांचे आज नांदगावला जोरदार स्वागत करण्यात आले समीर भुजबळ यांनी नांदगाव शहरातील अनेक गणेश मंडळाना भेट देऊन महाआरती केली यावेळी महिला पुरुषांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.यावेळी तरूणांनी FIX MLA समीर भाऊ असे आशयाचे फलक धरून समीर भुजबळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.कालच्या या कार्यक्रमामुळे समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी करणार हे निश्चित झाले आहे त्या दृष्टीने त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता काम सुरू केले असुन सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. आगामी होणारी विधानसभा निवडणूक भुजबळ परिवाराकडून लढण्याचे संकेत आज समीर भुजबळ यांच्या दौऱ्यात स्पष्ट झाले आहेत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ हे नांदगाव दौऱ्यावर आले होते नांदगाव शहरातील अनेक गणेश मंडळांना भेटी देऊन समीर भुजबळ यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी तरुण महिला व पुरुष यांच्यासह जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तरुणांनी समीर भुजबळ यांचे पोस्टर हातात धरून आपण fix mla आहे आणि आपण निवडणूक लढवावी अशी हाक दिली यावेळी समीर भुजबळ यांनी महिलांसोबत फोटो काढले आरती झाल्यानंतर समीर भुजबळ यांनी काही काळ तरुणासोबत डान्स देखील केला.यावेळी समीर भुजबळ यांचे फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले.
फिक्स एम एल ए पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष…!
समीर भुजबळ हे आज नांदगाव शहराच्या दौऱ्यावर आले असताना आज त्यांनी शहरातील गणेश मंडळाना भेटी दिल्या त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी त्यांचा फोटो असलेले बॅनर घेऊन तरुणांनी फिक्स एम एल ए असे पोस्टर हातात घेतले होते या पोस्टर ने सर्वांचे लक्ष वेधले.
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…